- ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्जकडून खेळणारा शशांक सिंग (Shashank Singh) या हंगामात सुपरस्टार बनला आहे. शशांक पंजाब किंग्सकडून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. शशांकला आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात पंजाबने २० लाख रुपयांना विकत घेतले होते. शशांकच्या खेळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. याचदरम्यान शशांकने दिलेल्या एका मुलाखतीची सध्या चर्चा रंगली आहे. (IPL 2024 Shashank Singh)
शशांक सिंहचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. शशांकला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न त्याच्या वडिलांनीच पाहिले होते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आयपीएस होऊनही वडिलांनी आपल्या मुलाला शशांकला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न का पाहिले? शशांकने (Shashank Singh) स्वतःच खुलासा केला होता की, त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेट खेळावे. ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत शशांक म्हणाला होता की, ‘वडिलांचं स्वप्न होतं की मी क्रिकेटर व्हावं. लहानपणी वडील स्वतः गोलंदाजी करत माझा सराव घ्यायचे. त्यांनी मला घरी टर्फ पिच बनवून क्रिकेट खेळायला शिकवले, असं शशांकने सांगितले. (IPL 2024 Shashank Singh)
शशांकने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६५.७ च्या सरासरीने आणि १८२.६ च्या स्टाइक रेटने २६३ धावा केल्या. शशांकने दोन अर्धशतक झळकावले आहेत. शशांकने (Shashank Singh) आतापर्यंत १९ षटकार आणि १८ षटकार टोलावले आहेत. महत्वाचं म्हणजे शशांकने छोट्या-छोट्या पण स्फोटक खेळी करुन सर्वांना प्रभावित केले आहे. (IPL 2024 Shashank Singh)
(हेही वाचा – Missile Attack: रशियातून भारतात तेल घेऊन येणाऱ्या जहाजावर लाल समुद्रात क्षेपणास्र हल्ला)
शशांक सिंह (Shashank Singh) हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. शशांक सिंह गोलंदाजी देखील करु शकतो. आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंहला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीनं पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्सनं शशांक सिंहला संघात घेतलं होतं मात्र काही कारणांमुळं त्यांना आपण चुकीच्या खेळाडूला संघात घेतल्याचं वाटलं होतं. काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबनं शशांक सिंहला संघात घेतल्याचं जाहीर केलं होतं. (IPL 2024 Shashank Singh)
04 एप्रिल रोजी झालेल्या पंजाब आणि गुजरात विरुद्धच्या सामन्यात देखील शशांकने स्फोटक खेळी केली होती. यानंतर त्याने केलेल्या विधानाची खूप चर्चा झाली. मला यापूर्वी अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शशांक सिंगने (Shashank Singh) स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू तेव्हाच कामगिरी करू शकतो जेव्हा त्याच्यावर विश्वास दाखवला जातो आणि त्याला संधी दिली जाते, असं शशांक म्हणाला होता. सनरायझर्स हैदराबादने त्याला २०२२ मध्ये खेळण्यासाठी जास्त संधी दिली नव्हती. (IPL 2024 Shashank Singh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community