पंकजा मुंडेंना सर्वधर्म समभावाचा साक्षात्कार! सोशल मीडियात ट्रोल!

एका ट्विटर युजरने तात्काळ विचारले कि, सर्वधर्मसमभावाचा किडा येतोय, पक्षांतराचा विचार मानत येतोय का...ताईसाहेब? अशी विचारणा केली.

136
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या राजकारणात तशा सक्रिय दिसत नाहीत, पक्ष कार्यातही त्या अधूनमधून दिसतात. बीडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर त्यांनी त्यांचे बंधू, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. आता त्या सोशल मीडियात सक्रिय झाल्या, तेव्हा त्यांनी सर्वधर्म समभावाच्या भावना व्यक्त केल्या. त्यावर त्या सोशल मीडियात ट्राेल झाल्या आहेत. पंकजा ताई पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल एका नेटकरीने विचारला आहे.

पंकजा मुंडेंनी कोणते केले ट्विट?

पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून दादर, कबुतरखाना येथील श्री हनुमानाच्या गोल मंदिराचा फोटो ट्विट केला. त्यात मंदिरच्या समोर क्राईस्ट आणि मागे चाँदतारा दिसत आहे. त्या फोटोला पंकजा मुंडे यांनी फोटो ओळ देताना म्हटले कि, ‘हे छायाचित्र माझ्या पतीने पाठवले आहे. हे छायाचित्र काय सांगते, हे मला उमगले आहे, जगाला हे उमगले तर… तुम्ही समजलात का? विविधता तरीही एकता’ हे मी समजून गेली आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

काही वेळातच पंकजा मुंडे यांचे हे ट्विट सर्वत्र पसरले. आणि अनेकांनी मुंडे यांच्यावर टीका केली. एका ट्विटर युजरने तात्काळ विचारले कि, सर्वधर्मसमभावाचा किडा येतोय, पक्षांतराचा विचार मानत येतोय का…ताईसाहेब? अशी विचारणा केली.

तर एकाने ‘पुष्कळ झाले समधर्म समभाव पण मुस्लिम व ख्रिस्त लोक कधीच ही भावना उघडपणे बोलून किंवा आचरणातून दाखवत नाही’, असे म्हटले.

२०१९ विधानसभा निवडणुकीपासून नाराज आहेत!

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभेत पराभव झाला. त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय मुंडे विजयी झाले होते. त्यावेळी पंकजा मुंडे या पक्षाच्या नेत्यांवर नाराज होत्या. त्यांच्यामुळे आपला पराभव झाला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावेळी त्या पक्षबदल करतील, अशी चर्चा सुरु होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.