Bhanu Athaiya : ऑस्कर जिंकणारी पहिली महिला – भानू अथैय्या

141
Bhanu Athaiya : ऑस्कर जिंकणारी पहिली महिला - भानू अथैय्या
Bhanu Athaiya : ऑस्कर जिंकणारी पहिली महिला - भानू अथैय्या

भानू अथैया (Bhanu Athaiya) ही भारतीय वेशभूषाकार आणि चित्रकार होती. अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑकर जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. बॉलीवूडची सर्वात प्रतिष्ठित पोशाख डिझायनर होती. बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपची (Bombay Progressive Artists Group) ती एकमेव महिला सदस्य होत्या. तिच्या दोन कलाकृतींचा समावेश १९५३ च्या बॉम्बे येथील प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप शोमध्ये करण्यात आला होता. (Bhanu Athaiya)

(हेही वाचा- World Workplace Safety and Health Day : २८ एप्रिल – जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन)

तिचा महाराष्ट्रातील कोल्हापुरातील मराठी ब्राह्मण कुटुंबात २८ एप्रिल १९२९ रोजी झाला. तिचे आधीचे नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये असे होते. तिचे वडील अण्णासाहेब हे स्वयंशिक्षित कलाकार आणि छायाचित्रकार होते ज्यांनी बाबुराव पेंटर यांच्या चित्रपटांमध्ये काम केले होते. भानुमतीचं शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झालं. ‘लेडी इन रिपोज’ नावाच्या कलाकृतीसाठी १९५१ मध्ये तिला उषा देशमुख सुवर्णपदक (Usha Deshmukh Gold Medal) मिळाले होते. (Bhanu Athaiya)

पुढे ती चित्रपटांकडे वळली. त्यानंतर तिने कधीच मागे वळू पाहिलं नाही. तिची कारकीर्द यशस्वी होती. बॉलीवूड चित्रपटांमध्ये वेशभूषाकाराचं काम करताना ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचली. तिने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गुरु दत्त, यश चोप्रा, बी.आर. चोप्रा, राज कपूर, विजय आनंद, राज खोसला आणि आशुतोष गोवारीकर अशा आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. (Bhanu Athaiya)

(हेही वाचा- Nagpur Banner: नागपूरमध्ये मतदारांचा टक्का घसरला, रस्त्यांवर लावले बॅनर्स)

सिआयडी, प्यासा, साहिब बीबी और गुलाम, आम्रपाली, तीसरी मंझिल, सत्यम शिवम सुंदरम, रझिया सुलतान, चांदनी, १९४२: एक प्रेम कथा, लगान स्वदेश अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी तिने वेशभुषाकार म्हणून काम केले आहे. गांधी या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट ड्रेस डिझाइनसाठी अकादमी पुरस्कार मिळाला होता आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइनसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. (Bhanu Athaiya)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.