सॅम्युअल फिनले ब्रीस मोर्स हे अमेरिकन संशोधक आणि चित्रकार होते. त्यांनी एक पोर्ट्रेट चित्रकार म्हणून आपली छबी समाजात बिंबवली होती. त्यानंतर मोर्स यांनी युरोपियन टेलिग्राफवर आधारित असलेल्या सिंगल-वायर टेलिग्राफ या सिस्टमच्या शोधात आपलं मोलाचं योगदान दिलं. १८३७ साली ते मोर्स कोडचे सह-विकासकही होते. तसेच त्यांनी टेलिग्राफीचा व्यावसायिक वापर वाढवण्यासाठी मदत केली होती. (Painter Samuel Morse)
सॅम्युअल मोर्स यांचा जन्म चार्ल्सटाउन येथे २७ एप्रिल १७९१ साली झाला. त्यांच्या वडिलांचं नाव पाद्री जेदिडिया मोर्स असं होतं. ते एक भूगोलशास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या आईचं नाव एलिझाबेथ ॲन फिनले ब्रीस असं होतं. त्यांचे वडील कॅल्विनवादी होते आणि फेडरलिस्ट पक्षाचे समर्थक होते.
(हेही वाचा – Global Warming: हिंदी महासागर वेगाने तापतोय, भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसणार )
सॅम्युअल मोर्स यांनी एन्डोव्हर इथल्या फिलिप्स अॅकॅडमीमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी गणित, विज्ञान आणि धार्मिक तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी येल कॉलेज येथे प्रवेश घेतला. येल येथे शिकत असताना ते बेंजामिन सिलमन आणि जेरेमिया डे यांचे वीजप्रवाह या विषयावरचे लेक्चर ऐकायचे. ते सोसायटी ऑफ ब्रदर्स इन युनिटीचे सदस्य होते. पोट्रेट पेंटिंग करून ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. १८१० साली त्यांनी येल कॉलेजमधून फी बीटा काप्पा हॉनर्स ही पदवी मिळवली.
सॅम्युअल मोर्स हे १८१५ साली अमेरिकन अँटिक्वेरियन सोसायटीचे सदस्य म्हणून निवडून आले. तसेच परदेशातून त्यांना अनेक सन्मान आणि आर्थिक पुरस्कार देण्यात आले होते. १० जून १८७१ साली न्यूयॉर्क सिटीच्या सेंट्रल पार्कमध्ये सॅम्युअल मोर्स यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. तसेच १८९६ सालच्या युनायटेड स्टेट्सच्या चलनाच्या दोन-डॉलर बिल सिल्व्हर सर्टिफिकेट सिरीजच्या दुसर्या बाजूस सॅम्युअल मोर्स यांचे एक कोरलेले पोर्ट्रेट होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community