पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आले आहेत. कर्नाटकातील बेळगावमध्ये पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसला (Congress) देशाचे यश आवडत नाही. त्यांनी आधी कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित केले आणि नंतर ईव्हीएमच्या बहाण्याने संपूर्ण जगात भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.काँग्रेसच्या (Congress) राजपुत्राला आपल्या राजे आणि सम्राटांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेच्या राजकारणासाठी राजे-महाराजांच्या विरोधात बोलण्याची हिंमत त्यांच्यात आहे, आणि नवाब, बादशाह, सुलतान यांच्याविरुद्ध एक शब्दही काढण्याची ताकद त्यांच्यात नाही. असं म्हणत पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
कोरोना लसीपासून ते EVM पर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित
जेव्हा भारत मजबूत होतो तेव्हा प्रत्येक भारतीय आनंदी असतो परंतु काँग्रेस (Congress) राष्ट्रहितापासून इतकी दूर गेली आहे की त्यांना देशाचे यश आवडत नाही. भारताच्या प्रत्येक यशाची त्यांना लाज वाटू लागली आहे. ईव्हीएमच्या निमित्ताने संपूर्ण जगात भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. (PM Narendra Modi)
हुबळी कॉलेजमध्ये हत्या झाली, इथेही काँग्रेसने तुष्टीकरण केले
18 एप्रिल रोजी हुबळी येथील महाविद्यालयात काँग्रेस नगरसेवकाची मुलगी नेहाची फयाजने जाहीरपणे चाकू भोसकून हत्या केली होती. हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये जे घडले त्यामुळे देशात भूकंप झाला, त्या मुलीचे कुटुंबीय कारवाईची मागणी करत राहिले पण काँग्रेस सरकार तुष्टीकरणाच्या दबावाला प्राधान्य देते. त्यांना त्यांच्या व्होटबँकेची चिंता आहे. बंगळुरूमधील कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचाही पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) उल्लेख केला. ते म्हणाले, बंगळुरूमध्ये कॅफेमध्ये स्फोट झाला तेव्हाही काँग्रेस सरकारने गांभीर्याने घेतले नाही. गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असावा. असे ते म्हणाले. काँग्रेस देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ का फेकत आहे? असा सवाल पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) उपस्थित केला.
काँग्रेसी राजपुत्र आमच्या राजे-महाराजांना जुलमी म्हणतात
काँग्रेसचे राजपुत्र म्हणतात की, भारतातील राजे-महाराजे जुलमी होते, ते गरिबांच्या जमिनी हिसकावून घेत होते. काँग्रेसच्या राजपुत्राने छत्रपती शिवाजी महाराज, राणी चिन्नम्मा यांचा अपमान केला आहे. आमची शेकडो मंदिरे पाडणाऱ्या औरंगजेबाचे अत्याचार काँग्रेसला आठवत नाहीत. औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्या पक्षांशी काँग्रेस आनंदाने जुळते. ज्यांनी आमची तीर्थक्षेत्रे उध्वस्त केली, लुटले आणि गायी मारल्या त्यांचा विसर पडला. आम्ही देशातील महिला, शेतकरी, तरुण आणि गरिबांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. गेल्या 10 वर्षात भाजप आणि एनडीए सरकारने देशातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी खूप काम केले आहे. काँग्रेस मानसिकदृष्ट्या इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत होती. काँग्रेस देशहितापासून दूर गेली असून फक्त घराण्याच्या हिताच्या विळख्यात अडकली आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community