ऑक्सिजन काँसंट्रेटर्स संदर्भात संशोधनविषयक प्रस्ताव पाठवण्याचे केंद्राचे आवाहन

शैक्षणिक आणि संशोधन संस्था/प्रयोगशाळा, विद्यापीठे आणि वैद्यकीय शिक्षणसंस्था, स्टार्ट अप्स तसेच उद्योगक्षेत्रांकडून (छोट्या/पोर्टेबल) ऑक्सिजन काँसंट्रेटर्सच्या निर्मितीवर संशोधन प्रस्ताव मागवले आहेत.

134

कोविड-19 महामारीचा सामना करण्याच्या लढाईत आवश्यक ठरलेले ऑक्सिजन काँसंट्रेटर्स भारतातच विकसित केले जाण्यास प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत, त्यातील महत्वाचे घटक आणि ऑक्सिजन काँसंट्रेटर्समध्ये नवनव्या संशोधनांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, अशी संशोधने पाठवण्याचे आवाहनही केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, अत्यावश्यक औषधांच्या यादीत ऑक्सिजनचा समावेश केला असून ऑक्सिजन एक दुर्मिळ घटक ठरला असून, सध्याच्या वैद्यकीय परिस्थितीत तर त्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे, सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.

बॉम्बेहायकडील ५ मृतदेह रायगड समुद्रकिनारी सापडले?

या अंतर्गत, शैक्षणिक आणि संशोधन संस्था/प्रयोगशाळा, विद्यापीठे आणि वैद्यकीय शिक्षणसंस्था, स्टार्ट अप्स तसेच उद्योगक्षेत्रांकडून (छोट्या/पोर्टेबल) ऑक्सिजन काँसंट्रेटर्सच्या निर्मितीवर संशोधन प्रस्ताव मागवले आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी संधोधन मंडळ, या केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील संस्थेला हे संशोधन प्रस्ताव पाठवायचे आवाहन करण्यात आले आहे. ऑक्सिजन वेगळे करण्याची प्रक्रिया, डिझाईन, विकास आणि महत्वाच्या घटकांचे उत्पादन करण्यासाठी पर्यायी साधने, जसे की व्हॉल्व्ह, आणि तेलविरहीत कॉम्प्रेसर, कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाईनमध्ये सुधरणा, ऑक्सिजनचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यासाठी ऑक्सिजन फ्लो डिव्हाइस आणि ऑक्सिजन पातळी जाणून घेण्यासाठी सेन्सर्स आणि इतर यांचा समावेश आपल्या प्रस्तावांमध्ये केला जावा.

प्रस्ताव 15 जून 2021 पर्यंत पाठवण्याचे आवाहन!

उद्योगक्षेत्रातील वैज्ञानिकांनी शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक/अभ्यासाकांशी समन्वय साधून एकत्रितपणे संशोधन करावे. या संशोधनांनुसार उत्पादन निर्मिती करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील भागीदारांना या संशोधनाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी तंत्रज्ञान विकास मंडळाकडे निधीचा प्रस्ताव विचारार्थ पाठवला जाईल. या प्रकल्पाचा कालावधी एक वर्षाचा असेल. यातून भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन काँसंट्रेटर्सचची निर्मिती होऊ शकेल. ज्याद्वारे, रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यास मदत मिळेल. या संबंधीचे प्रस्ताव विहित नमुन्यात भरुन SERB चे ऑनलाईन पोर्टल, www.serbonline.in वर 15 जून 2021 पर्यंत पाठवायचे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.