राळेगाव-यवतमाळ रोडवरील वाटखेड गावाजवळ लग्नाचे वऱ्हाडा घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत यवतमाळकडे जाणाऱ्या पाहुण्यांच्या उभ्या असलेल्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली.
या अपघातात ४ जण ठार, तर १० जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रमाणात बचाव पथक तैनात करून जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. श्रुती गजानन भोयर (१२) परी गजानन भोयर (१०) या दोन सख्ख्या बहिणी, तर लिलाबाई पांढरे(५५) आणि निलेश छापेकर (३५) यांचा मृत्यू झाला.जखमींमध्ये माया धांदे, छकुली बंधरे, सोनू काफेकर, आर्यन काफेकर, रूणाल बुरांडे, कुणाल काफेकर, शालीनी बुरांडे, नीलेश काफेकर, अक्षय राऊत (सर्व रा. घोन्सी, ता. पांढरकवडा) यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – BCG Vaccine: १८ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार बीसीजी लस, २९ एप्रिलपासून सर्वेक्षण सुरू )
अपघातस्थळी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राळेगाव येथील प्रवीण महाजन यांनी राळेगाव पोलिसांना कळविली. सचिन दरणे, शशिकांत धुमाळ, वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन नामदेव हेने (रा. आर्णी) याला राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community