भाजपाकडून दिला जाणारा चारशे पारचा नारा कशासाठी, आपली घटना बदलण्यासाठी. घटना बदलण्याची औदासा का सुचली? महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवत आहात. महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला संपवत आहात. एवढंच काय बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, त्यांनी राज्यघटना लिहिली म्हणूनच महाराष्ट्र द्वेषापोटी मोदी-शहा संविधान बदलू पाहात आहे, असा आरोप उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग येथील सभेत बोलताना उंचीएवढा लघु उद्योग तरी कोकणात आणला का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे यांना डिवचलं आहे.
दिल्लीतील हे दोघे महाराष्ट्रद्वेषी आहेत. आम्ही काय करणार, तुमच्या गुजरातमध्ये स्वराज्यद्वेषी जन्मला. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब जन्मले. हे आमचे वैभव असून देशाची शान आहेत, असे म्हणत ठाकरेंनी मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
(हेही पहा – Yavatmal Accident: यवतमाळमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी)
गद्दाराला शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण
कोकणात मला प्रचार करायची गरजच नाही; कारण कोकण हे शिवसेनेचं आणि ठाकरे कुटुंबाचं हृदय आहे असं उद्धव ठाकरेंनी विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत म्हटले. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही तुम्ही जागच्या जागी उभे आहात. त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. गद्दाराला शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण दिले. पण काय घडलं बघा की, कोकणातून धनुष्यबाणही गायब केला आहे. गद्दारांना कळलंच नाही, गद्दारांचे मालक शिवसेनेचं कोकणाशी असलेलं नातं तोडायला निघाले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नाकर्त्यांच्या हातामध्ये भाजपा पक्ष गेला आणि भाजपा पक्ष संपवून टाकला. अरे शिवसेना अख्खी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदी आणि शाह यांना किती वेळा यावं लागलं होतं? कारण अख्खी शिवसेना त्यांच्यासोबत होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटिकल लीग
सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. मॅच बघताना, पंचायत होते की, हा खेळाडू आपल्याकडे होता, तर नाही तो तिकडे गेला. अरे, तो तिकडे होता, नाही तो आता तिकडे गेला, तसं भारताच्या राजकारणात झालं आहे. आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटिकल लीग असंच झालं आहे. मोदी काहीही बोलतील, पण त्यांना आधी २०१९ आणि २०१४ चा आत्मविश्वास दिसत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गात लोकं माझ्यासोबत आहेत, याचा मला अभिमान आहे. गद्दारांना मझ्यावर सोडून मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गद्दारांची आणि गुंडांची घराणेशाही भाजपाला चालते. ते तुम्हाला नको, असेल तर कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. जुलूम जबरदस्तीने राज केले जात आहे, असेही उद्धव ठाकरे सभेदरम्यान म्हणाले.
हेही पहा –