लोकसभा २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) निवडणुकीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे, तर मतदानाचे आणखी तीन टप्पे बाकी असून येत्या ०१ जून पर्यंत राज्यातील सर्व टप्पे पार पडतील. अशातच निवडणुकींच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा जोरदार प्रचार करत असून, रविवारी झालेल्या भाषणात त्यानी २०१९ ला पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काय-काय घडलं होतं? तसेच २०१७ ची चर्चा काय होती? हे सर्व भर सभेत सांगितले. शरद पवारांना (Sharad Pawar) शिवसेना आवडत नव्हती म्हणून तेव्हा बोलणी झाली नाही. हे देखील अजित पवार सभेत बोलून गेले. (Ajit Pawar)
२०१९ च्या शपथविधीच्या आधी काय घडलं?
“२०१९ ची निवडणूक (Election 2019) झाली. त्यावेळी दिल्लीत आम्हाला बोलवलं. प्रफुल्ल पटेल, शरद पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठक झाली. एका उद्योगपतीच्या बंगल्यावर बैठक पार पडली. पाच ते सहा मिटिंग झाल्या. मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण? पालकमंत्री कोण? हे सगळं ठरलं. पण विधानसभा अध्यक्ष वरून पुन्हा मिटिंग फिस्कटली आणि शरद पवार पुन्हा म्हणाले भाजपासोबत चर्चा करा. जयंत पाटील म्हणाले तुम्ही वर्षावर जा. पण दाराची फट उघडी ठेवा. पहाटे शपथविधी (oath ceremony) नाही नंतर सकाळी ०८ वाजता शपथविधी झाला, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी मला अमित शाह म्हणाले आम्हाला मागचा अनुभव काही चांगला नाही. पण अजित तू शब्दाला पक्का आहेस. तुझ्यादेखत हे सगळं ठरलं आहे. त्यामुळे हे असंच करायचं आम्ही ठरवलं. त्यानंतर अजित पवार यांनी हो म्हटलं. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Uddhav Thackeray: सिंधुदुर्गतील सभेत राणेंना डिवचत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर निशाणा)
त्या विधानाने वाटोळं झालं- अजित पवार
मी काही दिवसांपूर्वी धरणाबद्दल बोललो होतो. पण त्यामुळे माझं वाटोळं झालं ना राव… आता मी शब्द मी जपून वापरतो. काम करणाऱ्या लोकांकडून चुका होतात. कार्यकर्त्यांना सांगताना देखील काही जण म्हणतात अजित पवार दम देतायेत. माझ्या कार्यकर्त्यांना बोलतोय कुणाच्या पोटात का दुखावं? कुणी काही सांगेल आता आम्ही कामं करू. परंतु त्यांच्या काळात झाली नाही त्याचं काय?, असा सवाल अजित पवारांनी विचारला. (Ajit Pawar)
चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून ठेवलाय. पारदर्शक कारभाराला महत्व देण्याची गरज आहे. मी कधीही सत्तेचा माज येऊन दिला नाही. उद्याच्या ०७ तारखेपर्यंत कळ काढा. कामगारांच्या बाबतीत मी स्वतः कंपनीत जाऊन कामगारांना का काढलं याबद्दल जाब विचारणार आहे, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. (Ajit Pawar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community