Dubai Airport: दुबईत जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधण्याची घोषणा, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या

नवीन विमानतळाला 'अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे नाव दिले जाईल.

185
Dubai Airport: दुबईत जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधण्याची घोषणा, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या

अलीकडेच विक्रमी पावसामुळे दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली आल्याने विमानसेवा ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी रविवारी दुबईत नवीन विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे. दुबईतील नवीन विमानतळ हे जगातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे. याशिवाय ते एक बंदर, शहरी केंद्र आणि नवीन जागतिक केंद्र असेल. या विमानतळासाठी सुमारे २.९ लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. (Dubai Airport)

नवीन विमानतळाला ‘अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे नाव दिले जाईल. ७० एकरांवर पसरलेल्या विमानतळावर ५ समांतर धावपट्ट्या असतील. या विमानतळाची वाहन क्षमता तब्बल २६ कोटी प्रवासी इतकी असेल, तर परिसराला सुमारे ४०० दरवाजे असणार आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी १.२० कोटी टन माल वाहतूक करण्याची या विमानतळाची क्षमता असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.  (Dubai Airport)

(हेही वाचा – Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान )

भावी पिढ्यांचा शाश्वत विकास
मालवाहतूक हवाई वाहतूक क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांची कार्यालये या विमानतळावर असतील. शेख मकतूम यांनी आपल्या अधिकृत ‘X’वरील एका पोस्टमध्ये ही घोषणा केली. या पोस्टमध्ये त्यांनी भावी पिढ्यांचा निरंतर आणि शाश्वत विकास हे विमानतळ सुनिश्चित करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.