Weather Update: पुढील ३-४ दिवस उष्माघात वाढण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांनी दिले ‘हे’ सल्ले; वाचा सविस्तर

322
Department of Meteorology: पुण्यासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, ५ मेपर्यंत तापमानवाढीचा इशारा

रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरणामुळे उष्माघाताचा अलर्ट देण्यात आला आहे. वाशिम शहराचा पारा सर्वाधिक ४३ अंशांवर पोहोचला होता. राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागात शुष्क अन् कोरडे वातावरण आहे, त्यामुळे कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश शहरांचे सरासरी कमाल तापमान ४१ ते ४२ अंशांवर गेले आहे. (Weather Update)

याबाबत पुणे वेधशाळेचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वाळवंटातून महाराष्ट्रात यंदा सतत उष्ण वारे येत आहेत. त्याचा परिणाम कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रावर जास्त होत आहे. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट तीव्र होत आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला उष्ण लाटांचा अलर्ट देण्यात आला असून १ मेपर्यंत राज्यात उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Weather Update)

(हेही वाचा – Best Bus Fares : बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा, लवकर होणार बस प्रवासात वाढ? )

नाशिकमध्येही सर्वोच्च तापमानाची नोंद…
नाशिकमध्येही गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झाली असून यंदाच्या हंगामातील ४१.२ अंश सेल्सियस ही विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांचा नागरिकांना सल्ला…
– उन्हात जास्त वेळ एकाच जागी थांबू नका.
– पाणी भरपूर प्या.
– हलके, सुती कपडे वापरा.
– दुपारी १ ते ४ पर्यंत शरीर थंड ठेवा.
– डोकेदुखी, हाता-पायात गोळे येणे, खूप थकवा, चक्कर आल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
– थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा.
– दुपारी १२ ते ४ वेळेत घराबाहेर पडू नये.
-आवश्यक कामासाठी जाताना काळजी घ्यावी.
– घराबाहेर पडताना छत्री, गॉगल, बूट, चप्पल वापरावे
-प्रवासात पाण्याची बाटली जवळ बाळगावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.