IPL 2024, RCB vs GT : विल जॅक्सच्या शतकानंतर विराटच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तेव्हा…

IPL 2024, RCB vs GT : विल जॅक्सने ४० चेंडूंत शतक पूर्ण करत बंगळुरूला विजय मिळवून दिला

169
 IPL 2024, RCB vs GT : विल जॅक्सच्या शतकानंतर विराटच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तेव्हा…
 IPL 2024, RCB vs GT : विल जॅक्सच्या शतकानंतर विराटच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तेव्हा…
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या हंगामातील ४४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा (IPL 2024, RCB vs GT) ९ गडी आणि ४ षटकं राखून पराभव केला. देशातील सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) दोन्ही बाजूंनी धुवाधार फलंदाजी बघायला मिळाली. आणि ४०६ धावा निघाल्या. यात आघाडीवर होता बंगळुरूचा घणाघाती फलंदाज विल जॅक्स. त्याने ४१ चेंडूंत  नाबाद १०० धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरश: कत्तल केली. त्याच्या १०० धावांमध्ये ६० धावा या फक्त षटकांनी वसूल केलेल्या होत्या. त्यामुळेच २०० धावांचा पाठलाग करताना बंगळुरूने २४ चेंडू राखून विजय मिळवला.  (IPL 2024, RCB vs GT)

(हेही वाचा- CM Eknath Shinde: “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन”, मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका रोख कुणाकडे?)

विल जॅक्स (Will Jacks) फटकेबाजी करत असताना विराट (Virat) दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता. त्याने ४४ चेंडूंत ७० धावा केल्या. सामन्यात लक्षवेधी ठरला तो सामन्यातील शेवटचा षटकार. बंगळुरूला विजयासाठी एक धाव हवी असताना विल जॅक्सने रशिद खानच्या (Rashid Khan) चेंडूवर थेट षटकार मारला आणि आपलं शतक पूर्ण केलं. संघाचा विजय आणि जॅक्सचं शतक पूर्ण झाल्याचा आनंद विराट कोहली नॉन-स्ट्रायकिंग एंडला लपवू शकला नाही. (IPL 2024, RCB vs GT)

विल जॅक्सची (Will Jacks) कालची खेळी बघितलेल्या लोकांना हे ठाऊक असेल. पण, शतकवीर जॅक्सची सुरुवात अडखळती झाली होती. त्याने १६ धावा केल्या तेव्हा विराटने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं होतं. मग जॅक्सची कामगिरी होती १७ चेंडूंत १७ धावा. चेंडू त्याच्या बॅटवर मधोमध बसतही नव्हते. पण, त्यानंतर चमत्कार झाला आणि जॅक्सने एकदम सहावा, सातवा गिअरच टाकला. (IPL 2024, RCB vs GT)

(हेही वाचा- Pune: जलचर पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी पुण्यात नैसर्गिक अधिवास आणि पक्षीगृहे उभारणार)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामन्यानंतर केलेलं एक ट्विट बोलकं आहे. सहा वाजून ४१ मिनिटांनी जॅक्स ५० धावांवर होता.  ६ वाजून ४७ मिनिटांनी त्याने शंभर धावा पूर्णही केल्या. अशी त्याची कामगिरी होती. जॅक्सने खेळाचा नूर पार पालटवून टाकला.  (IPL 2024, RCB vs GT)

 जॅक्सचा (Will Jacks) हा धडाका दुसऱ्या बाजूने पाहणारा कोहलीही आपलं आश्चर्य आणि कौतुक लपवू शकला नाही. स्वत: कोहलीनेही मधल्या षटकांमध्ये धिमी फलंदाजी केल्याचा त्याच्यावर असलेला ठपका या सामन्यात पुसण्याचा प्रयत्न केला. फिरकीपटूंना सढळपणे स्विपचे फटके मारत त्याने धावा वसूल केल्या. जॅक्सबरोबर त्याने १६६ धावांची भागिदारी केली.  शेवटच्या चेंडूवर जॅक्सने शतक पूर्ण केलं तेव्हाची कोहलीची प्रतिक्रिया तर अनमोल होती. (IPL 2024, RCB vs GT)

‘एकदा जॅक्सने फटकेबाजी सुरू केली की, तो किती वेगाने धावा करू शकतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, १६ षटकांत सामना संपवणं हे खूपच झालं. मी दुसऱ्या बाजूला त्याच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद लुटला,’ असं विराट सामन्यानंतर म्हणाला. (IPL 2024, RCB vs GT)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.