PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?

226
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?

लोकसभा निवडणुकीचे दोन (PM Narendra Modi) टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभा, प्रचार दौरे करत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे पुढचे ध्येय काय आहेत? याबाबत माहिती दिली. लोकांचा वीज आणि वाहतुकीवर होणारा खर्च शून्यावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याला आपले प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले. (PM Narendra Modi)

प्रत्येक घराचा वीज खर्च शून्य झाला पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “मला तीन गोष्टी हव्या आहेत. पहिली, प्रत्येक घराचा वीज खर्च शून्य झाला पाहिजे. दुसरी, अतिरिक्त वीज विकून पैसे कमवले पाहिजेत. तिसरे, आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचे आहे. इलेक्ट्रिक वाहने येतील. घराघरात अक्षय उर्जेरिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy)ची सुविधा मिळाल्याने सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलवर पैसे खर्च करण्याऐवजी घरी स्कूटर आणि कार चार्ज करू शकतील.” असे ते म्हणाले. (PM Narendra Modi)

भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल

अक्षय ऊर्जेचे फायदे सांगताना पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने पर्यावरण स्वच्छ राहील. यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर कोट्यवधी डॉलर्सची बचत होणार आहे. तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांचे सरकार भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. प्रत्येक क्षेत्रात आधीपासून राबवलेले धोरण यापुढेही कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. (PM Narendra Modi)

भारताला स्टार्टअप हब, मॅन्युफॅक्चरिंग हब आणि इनोव्हेशन हब बनवण्याचा प्रयत्न करेल

जगातील भारतीय अर्थव्यवस्थेविषयी बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आम्ही 11 व्या क्रमांकावर होतो. खूप प्रयत्नांनंतर आम्ही ती 5 व्या स्थानावर आणली. आता आम्ही आणखी प्रयत्न करू आणि देशाला तिसऱ्या क्रमांकावर नेऊ, म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात आमचे धोरण चालू ठेवायचे आहे. आपले सरकार येत्या पाच वर्षांत भारताला स्टार्टअप हब, मॅन्युफॅक्चरिंग हब आणि इनोव्हेशन हब बनवण्याचा प्रयत्न करेल.” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.