लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर देशभरात आचारसंहिता (Mumbai Cash Seized) सुरु आहे. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम (Mumbai Cash Seized) बाळगण्यावर आहे. अशातच, दादरमधून निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. दादरच्या शिंदे वाडी परिसरत लाखो रुपयांची रोकड जप्त (Mumbai Cash Seized) करण्यात आली आहे. जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांची ही रोख रक्कम होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनात ही रक्कम आढळली. (Mumbai Cash Seized)
(हेही वाचा –PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?)
दादरच्या शिंदे वाडी परिसरात एक कारमध्ये 1 लाख 80 हजाराची रोकड निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीन जप्त केली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत 1 लाख 80 हजारची रोकड होती. या पैशांबाबत चालकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने पोलिसांनी निवडणूक भरारी पथकाच्या मदतीने कारवाई केली आहे. (Mumbai Cash Seized)
(हेही वाचा –Narayan Rane: उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, नारायण राणेंचा ठाकरेंवर प्रहार)
… म्हणुन गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे
निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक गाड्यांची वाहतूक होत असते. त्यातूनही पैशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांमधील एन्ट्रीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. (Mumbai Cash Seized)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community