भारतातील प्रसिद्ध मसाले ब्रँड एमडीएच आणि एवरेस्टच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यापूर्वी सिंगापूर आणि हाँगकाँगने (Singapore and Hong Kong) एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेतही या संदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही भारतीय कंपन्यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. (MDH-Everest Spice Ban)
अमेरिकेच्या एफडीएनेही तपास सुरू केला
हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता अमेरिकाही या मसाल्यांच्या ब्रँडबाबत अलर्ट मोडमध्ये आली आहे. एवढेच नाही तर मालदीवने या मसाल्यांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांतील घटक तपासण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवले आहेत. (MDH-Everest Spice Ban)
(हेही वाचा – Eastern and Western express highway वरील ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट बाळगळणार?)
हाँगकाँग-सिंगापूरमध्ये विक्रीवर बंदी का?
यापूर्वी, MDH च्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर (MDH’s Madras Curry Powder, Sambar Masala Powder) आणि करी पावडरच्या विक्रीवर हाँगकाँगमध्ये धोकादायक कीटकनाशकांचे घटक आढल्यामुळे या मसाला वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर एव्हरेस्ट ब्रँडच्या उत्पादनाची विक्री देखील बंद करण्यात आली होती. यामध्ये कीटकनाशकांसाठी वापरले जाणारे ‘इथिलीन ऑक्साईड’ हे घटक कृषी उत्पादनांमध्ये आढळते. त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. असे सांगण्यात आले. हाँगकाँगनंतर सिंगापूरनेही या दोन कंपन्यांच्या मसाला ब्रँडवर बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही देशांनी दावा केला आहे की, त्यांना अनेक मसाल्यांच्या मिश्रणात कार्सिनोजेनिक कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडचा घटक आढळून आला आहे.
(हेही वाचा – Share Market: निवडणुकीच्या धामधुमीतही शेअर बाजारात तेजी, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ? जाणून घ्या )
एमडीएचने म्हटले – हे आरोप चुकीचे
एकीकडे एकामागोमाग एक देशात या दोन भारतीय मसाल्यांच्या ब्रँडच्या अडचणी वाढत आहेत, तर दुसरीकडे एमडीएच आणि एव्हरेस्टने असे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगितले. MDH ने त्यांच्या उत्पादनांमध्ये कॅन्सर (Cancer) निर्माण करणाऱ्या रसायनांचा वापर केल्याचा आरोप फेटाळला आहे आणि हे दावे पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहेत आणि त्यांच्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत असे म्हटले आहे. यापूर्वी, एव्हरेस्टने सांगितले होते की त्यांचे मसाले सुरक्षित आहेत आणि ते भारतीय मसाले मंडळाच्या प्रयोगशाळेकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच निर्यात केले जातात. (MDH-Everest Spice Ban)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community