लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता लक्ष लागले आहे ते तिसऱ्या टप्प्यांकडे. येत्या ०७ मे रोजी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडणार असून, यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या भावी खासदारचेही भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या सभेला जास्त लोक न आल्याचा दावा निलेश राणे (Nilesh Rane) आणि मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्याकडून केला जात आहे. यावरून सामंत यांनी उबाठा गटात १३ आमदार आहेत त्यातील ५ ते ६ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. (Uday Samant)
(हेही वाचा – Devendra Fadnavis: मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल)
महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri – Sindhudurga Lok Sabha) मतदार संघाचे उमेदवार आहेत. राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने जनता निवडून देईल. राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. (Uday Samant)
(हेही वाचा – Devendra Fadnavis: मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल)
दरम्यान, रत्नागिरी येथे चौक सभा (Ratnagiri Corner Meeting) झाली. यामध्ये सभेची परिस्थिती पाहिली तर तेथे किती खुर्च्या होत्या असा सवाल उपस्थित केला. केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी यासाठी एकीकडे पत्र देता. तसेच तुमचे आमदार रिफायनरीला समर्थन देतात तर खासदार विरोध करतात. नक्की तुमची भूमिका काय आहे? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर उपस्थित केला. उबाठा गटाकडे १३ आमदार आहेत त्यातील ५-६ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, २ ते ३ खासदार आहेत हे सुद्धा संपर्कात आहेत, असेही सामंत सभेत म्हणाले. सोमवारी किंवा मंगळवारी शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. (Uday Samant)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community