Rahul Shewale : राहुल शेवाळेंनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन

190

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सोमवार, २९ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते. यानंतर राहुल शेवाळे यांची नामांकन रॅली काढण्यात आली.

राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.

siddhivinayak

त्यानंतर दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे जाऊन हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले.

(हेही वाचा उबाठा गटाचे ५ ते ६ आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात ; Uday Samant यांचा दावा  )

rahul 2

तसेच राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माहिमच्या दर्ग्यात जाऊन मुस्लिम बांधवांसह चादर चढवली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.