Mumbai South Central Constituency : दोन्ही उमेदवारांच्या मालमत्तेत ५.४० कोटींची वाढ

माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांनी सोमवारी २९ एप्रिलला मोठ्या मिरवणुका काढत आपले अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले.

222
Mumbai South Central Constituency : दोन्ही उमेदवारांच्या मालमत्तेत ५.४० कोटींची वाढ
  • सुजित महामुलकर

एकेकाळचे सहकारी आणि आजचे प्रतिस्पर्धी, दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील लोकसभा उमेदवार शिवसेना उबाठाचे अनिल देसाई आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे राहुल शेवाळे यांची मालमत्ता जवळपास रु. ५.४० कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mumbai South Central Constituency)

एप्रिलमध्येच राज्यसभा निवृत्ती, लोकसभा उमेदवारी

माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांनी आज सोमवारी २९ एप्रिलला मोठ्या मिरवणुका काढत आपले अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले. शेवाळे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत निवडून गेले तर अनिल देसाई २०१८ ला राज्यसभेवर गेले होते. देसाई राज्यसभा सदस्य म्हणून याच (एप्रिल) महिन्याच्या सुरुवातीला निवृत्त झाले तर महिन्याच्या शेवटी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. (Mumbai South Central Constituency)

मालमत्ता योगायोग

देसाई यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून त्यांची मालमत्ता गेल्या सहा वर्षात ५.४२ कोटी रुपयांनी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढणारे शिवसेना (शिंदे) उमेदवार आणि विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची मालमत्ता ५.४१ कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे. (Mumbai South Central Constituency)

(हेही वाचा – Crime : चिकन तंदुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या)

१७ वरून २२ कोटी

देसाई यांनी २०१८ मध्ये राज्यसभा निवडणूकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात मालमत्ता तपशिल दिला त्यात त्यांची आणि त्यांच्या पत्नीची एकत्रित एकूण मालमत्ता रु. १७.५२ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. तर आज सोमवारी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला त्यात त्यांची मालमत्ता रु. २२.९४ कोटी झाल्याचे नमूद केले आहे. म्हणजे गेल्या सहा वर्षात त्यांच्या मालमत्तेत रु ५.४२ कोटींची वाढ झाली. विशेष म्हणजे २०१९ मधील रु. १७ कोटीमध्ये १० कोटीपेक्षा अधिक मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावे आहे तर २०२४ मधील रु. २२.९४ कोटीमध्ये पतीचा वाटा रु. १३ कोटी आहे. (Mumbai South Central Constituency)

मालमत्ता वाढ

देसाई यांचे प्रतिस्पर्धी दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना पक्षाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनीही आजच (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरला. त्यात त्यांचीही मालमत्ता रु. ५.४१ कोटीनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही प्रतिस्पर्ध्याची मालमत्ता जवळपास सारखीच वाढण्याचा हा योगायोग आहे. शेवाळे यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढली त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांची मालमत्ता १.८२ कोटी असल्याचे नमूद केले होते तर आज सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांची एकूण मालमत्ता रु. ७.२३ झाल्याचे दिसून येत आहे. (Mumbai South Central Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.