दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात जवळपास ८५ टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रातून स्पष्ट झाले. (Mumbai South Constituency)
२०१९ ला मालमत्ता २.७१ कोटी
दक्षिण मुंबई मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत यांनी आज सोमवारी २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला. ७२-वर्षीय सावंत यांनी पाच वर्षापूर्वी २०१९ ला लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. २०१९ ला त्यांनी मालमत्ता जाहीर केली होती रु २.७१ कोटी. यामध्ये सावंत यांची स्वतःची जंगम मालमत्ता रु १.०१ कोटी तर पत्नीची रु १.३८ कोटी, अशी दाखवली होती तर स्थावर मालमत्ता केवळ ३१ लाख रुपये जाहीर केली होती. (Mumbai South Constituency)
(हेही वाचा – Mumbai South Central Constituency : दोन्ही उमेदवारांच्या मालमत्तेत ५.४० कोटींची वाढ)
२०२४ ला ५.०४ कोटी
आज सोमवारी सावंत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी एकूण मालमत्ता रु ५.०४ कोटी जाहीर केली आहे. सावंत यांची स्ततःची रु २.१३ कोटी, पत्नीच्या नावे २.२६ कोटी तर स्थावर मालमत्ता ६५ लाख जाहीर केली आहे. विशेष म्हणजे सावंत कुटुंबावर (पती-पत्नी) कोणतेही कर्ज नाही, असे प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Mumbai South Constituency)
शिवसेनेचा उमेदवारच नाही
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून महायुतीत अजूनही एकमत होत नसून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन तीन दिवस उलटले, तरी अद्याप शिवसेनेकडून (शिंदे) उमेदवार घोषित करण्यात आला नाही. हा मतदार संघ महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र शिवसेनेत उमेदवारीवरून एकमत होत नसल्याचे दिसत आहे. विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी त्या सावंत यांना कितपत टक्कर देतील याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. (Mumbai South Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community