BMC SWD : महापालिकेच्या फसवणुकीचा प्रयत्न, कंत्राटदाराविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर

मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकारी व मिठी नदीचे पदनिर्देशित अधिकारी असलेल्या प्रशांत रामगुडे यांनी महापालिकेच्यावतीने कांजूर मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

212
Mumbai C.C Road : रस्त्यांची अर्धवट कामे ३१ मे पर्यंत बंद करा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई महापालिकेने (BMC) एच पूर्व आणि एच पश्चिम येथील रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे ज्या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंपनीला आता बोगस कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिठी नदीच्या कामांमध्ये शिल्ट पुशर मशिनची खरेदी आणि त्याचा अनुभव असण्याची अट घातली होती. परंतु यासाठी नेदरलँड येथील कंपनीची बनावट कागदपत्रे सादर करून मेनदिप एंटरप्रायझेस या कंपनीने गैरमार्गाने मिठी नदीचे गाळ काढण्याचे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करून महापालिकेला फसवण्याचा प्रयत्न केल्याने महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (BMC SWD)

मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकारी व मिठी नदीचे पदनिर्देशित अधिकारी असलेल्या प्रशांत रामगुडे यांनी महापालिकेच्यावतीने कांजूर मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. त्यात त्यांनी सन २०२३मध्ये गाळ काढण्याच्या कामाकरता एकुण तीन निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातील इएस ४५८ साठी एकुण ०६ व इएस ४५९ साठी एकुण ०६ अशा एकुण १२ निविदा आल्या होत्या. त्यापैकी दोन्हीही कार्य संकेतांकासाठी मेसर्स मेनदिप एन्टरप्रायजेस यांनी स्वतंत्र निविदा सादर केल्या होत्या. परंतु निविदा प्रक्रियेदरम्यान दिलेल्या विहीत वेळेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने मेनदिप एन्टरप्रायजेस यांना दोन्ही कामांकरीता अप्रतिसादात्मक ठरविण्यात आले होते. त्यामुळे या कंपनीने महानगर महापालिकेच्या विरुध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी १ मार्च २०२३ रोजी झाली असता न्यायालयाने या कंपनीला महापालिकेच्या तक्रार निवारण समीतीकडे दाद मागण्याचे आदेश देवुन ही याचिका निकाली काढली. (BMC SWD)

(हेही वाचा – Mumbai Metro One : ‘मुंबई मेट्रो वन’कडे ४६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत; आता आली मुंबई महापालिकेला जाग)

गैरमार्गाने मिठी नदीचे गाळ काढण्याची निविदा मिळविण्याचा प्रयत्न

दरम्यान मेनदिप एन्टरप्रायजेस यांनी महापालिकेला (BMC) एका इमेल व्दारे काही उर्वरीत कागदपत्रे विहीत वेळेनंतर सादर केली. परंतु मेनदिप एन्टरप्रायजेस यांनी निविदा प्राप्त करण्यासाठी सादर केलेले मे. क्लिनटेक इन्फ्रा. प्रा. लि. संबंधीत कागदपत्रे बनावट असल्याबाबतची तक्रार उपप्रमुख अभियंता (प.ज.वा.) पुर्व उपनगरे या कार्यालयात केली होती. यावरून महापालिकेने मेनदिप एन्टरप्रायजेस यांनी १४ फेब्रुवारी २०२३ सादर केलेल्या इमेलमधील कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी हा ईमेल नेदरलँड येथील मेसर्स मोबोर्न या कपंनीला ०६ मार्च २०२३ रोजी पाठविला व त्यास मे. मोबार्न कपंनीने ०७ मार्च २०२३ रोजी उत्तर देत मेनदिप एन्टरप्रायजेस यांनी बृहन्मुबंई महानगरपालिकेस सादर केलेल्या कागदपत्रांपैकी मेनदिप एन्टरप्रायजेस व क्लिनटेक इन्फ्रा. प्रा. लि. यांच्या नावे असलेले मेसर्स मोबार्न यांनी कोणतेही पत्र दिले नसल्याचे व ही कागदपत्रे बनावट असल्याचे इमेलव्दारे कळविले. ही बाब पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपप्रमुख अभियंता (पुर्व उपनगरे) यांनी तक्रार निवारण समितीच्या लक्षात आणून दिली. (BMC SWD)

मेनदिप एन्टरप्रायजेस या कंपनीने मोबार्न यांनी मे. क्लिनटेक इन्फ्रा प्रा. लि. या कपंनीला अधिकृत विक्रेता म्हणुन नेमत असल्याबाबतचे पत्र बनावट असल्याचे दिसून आले. त्यानुसार महापालिकेने या कंपनीला प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावली होती, त्यानंतरही त्यांनी पुन्हा तीच कागदपत्रे सादर केली. त्यामुळे महापालिकेने या कंपनीची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली. त्यामुळे यासर्व बाबी बघता मेनदिप एन्टरप्रायजेसने महापालिकेला (BMC) बनावट कागदपत्रे सादर करून गैरमार्गाने मिठी नदीचे गाळ काढण्याची निविदा मिळविण्याचा प्रयत्न करून महापालिकेला फसविण्याचा प्रयत्न केल्याने या कंपनी विरोधात तक्रार नोंद करून कायदेशीर कारवाई होण्यासाठी कांजूर मार्ग पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. त्यानुसार या कंपनीविरोधात महापालिकेच्या फसवणुकीच्या प्रयत्नाबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (BMC SWD)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.