Shishir Shinde : माजी आमदार शिशिर शिंदे यांची ३ लाख रुपयांची फसवणूक

196
Shishir Shinde : माजी आमदार शिशिर शिंदे यांची ३ लाख रुपयांची फसवणूक

बांधकाम साहित्य पुरवठादाराकडून माजी आमदार शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांची ऑनलाइन लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शिशिर शिंदे यांनी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदार शिशिर शिंदे हे मुलुंड पूर्व येथे राहण्यास आहे, शिंदे हे मनसेचे माजी आमदार असून सध्या ते शिवसेना शिंदे गटात आहेत. ‘श्री. रेणुका डेव्हलपर्स’ नावाची बांधकाम कंपनी शिंदे यांची आहे. (Shishir Shinde)

मुलुंड पूर्व संत ज्ञानेश्वर मार्ग या ठिकाणी असलेल्या शिल्पाली इमारतीचे पुनर्विकासाचे काम शिंदे यांच्या ‘श्री. रेणुका डेव्हलपर्स’ कंपनीला मिळालेले आहे. बांधकाम व्यवसायात नवीनच असणारे शिंदे (Shishir Shinde) यांनी बांधकाम साहित्य किफायत दरात कुठे मिळेल हे शोधत असताना सोशल मीडियावर शिंदे यांनी बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची जाहिरात बघितली होती, या जाहिरातीत बांधकाम साहित्याचे दर स्वस्त दाखविण्यात आल्यामुळे शिंदे यांनी सदर व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली. (Shishir Shinde)

(हेही वाचा – IPL 2024 Rinku Singh : रिंकू सिंग जेव्हा अबराम खानचे चेंडू खेळताना अडखळतो…)

सदर व्यक्तीने शिंदे (Shishir Shinde) यांच्या कंपनीला लागणारे ग्रॅनाईडचा पुरवठा करण्याचे मान्य करून शिंदे यांना आगाऊ रक्कम म्हणून ३ लाख रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. शिंदे यांनी संबंधित बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर ऑनलाईन ३ लाख रुपये पाठविले, व उर्वरीत रक्कम साहित्य आल्यावर देण्याचे ठरले होते. परंतु शिंदे यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे साहित्य न आल्यामुळे त्यांनी सदर मोबाईल क्रमांकावर फोन केला मात्र फोन बंद असल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला अधिक तपास सुरू आसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Shishir Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.