Muslims : आरजू, हिना, सायमा यांची ‘घरवापसी’ जय श्रीराम म्हणत हलाल आणि बुरख्याचा केला निषेध 

मुस्लिम मुलगी हिना तरुणीला माहित आहे की, तिचे पूर्वज हिंदू होते ज्यांनी मुघल आक्रमकांच्या दबावाखाली इस्लामचा स्वीकार केला होता. 

412
Muslims : आरजू, हिना, सायमा यांची ‘घरवापसी’ जय श्रीराम म्हणत हलाल आणि बुरख्याचा केला निषेध 

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) २ जिल्ह्यांमध्ये तीन मुस्लिम मुलींनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म (Hindu Religion) स्वीकारला आहे. यापैकी २ मुली बरेली आणि १ महोबा येथील आहे. या सर्वांनी आपापल्या हिंदू प्रियकराशी वैदिक रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. लग्नादरम्यान ‘जय श्रीराम’ (Jai Shri Ram)  आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणा देण्यात आल्या. हिंदू संघटनांनी या विवाहसोहळ्यांना उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले आहेत. हे तिन्ही विवाह सोमवारी, २९ एप्रिल रोजी हिंदू मंदिरात पार पडले. (Muslims)

आरजू महोबात झाली ‘आरती’

पहिले प्रकरण महोबा जिल्ह्यातील (Mahoba District) आहे. माहितीनुसार, येथील पानवडी भागात राहणाऱ्या आरजूचे दिनेश जैस्वालसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. आरजूच्या आई-वडिलांचा या नात्याला विरोध होता. २ वर्षांपूर्वी आरजू दिनेशसोबत स्वतःच्या इच्छेने दिल्लीला गेली होती. आता दिल्लीहून परत आल्यानंतर सोमवारी दिनेश जैस्वाल आणि आरजू पानवडी शहरातील गौरैय्या मंदिरात पोहोचले. येथे दोघांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांची परस्पर संमती पाहून मंदिराच्या पुजाऱ्याने आरजू आणि दिनेशचा विवाह वैदिक रितीरिवाजाप्रमाणे पार पाडला. यावेळी दिनेशचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही उपस्थित होते. सर्वांनी मिळून जय श्रीरामचा जयघोष केला. तर आरजूला आरती हे नवीन नाव मिळाले.  (Muslims)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई मतदार संघातून शिवसेनेच्या यामिनी जाधवांना उमेदवारी)

बरेलीमध्ये हिना बनली ‘आकांक्षा’

‘घरवापसी’चे दुसरे प्रकरण बरेली जिल्ह्यातील (Bareilly District) आहे. येथील बहेरी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या हिना या मुस्लीम मुलीने शपथ दिली आहे की, तिचे पूर्वज हे हिंदू होते ज्यांनी मुघल आक्रमकांच्या दबावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. २५ वर्षीय हिनाने स्वत:ला आधीच प्रथा परंपरांवर विश्वास असलेली मुलगी असल्याचे सांगून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. सोमवारी हिनाची ‘घरवापसी’ पंडित केके शंखधर यांच्या माध्यमातून बरेलीच्या अगस्त्य मुनी आश्रमात झाली. ‘घरवापसी’ नंतर हिनाने तिचे नाव बदलून आकांक्षा गंगवार ठेवले. त्याच दिवशी हिनाने बरेली येथील आकाश गंगवारला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले आणि वैदिक विधीनुसार लग्न केले.  (Muslims)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधूसह ७ भारतीय बॅडमिंटनपटू खेळणार)

बरेलीमध्ये सायमा आता झाली ‘सोनी’ 

‘घरवापसी’चे तिसरे प्रकरण बरेलीतीलच आहे. येथील नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारी सायमा हिने स्वतःला शुद्ध करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. हे शुद्धीकरण बरेली येथील अगत्स्य मुनी आश्रमात झाले. कोणत्याही दबावाशिवाय स्वत:च्या इच्छेने घरवापसी करणाऱ्या २५ वर्षीय सायमाने स्वत:चे नाव सोनी ठेवले आहे. इस्लाममधील तिहेरी तलाक आणि हलाला यांसारख्या वाईट प्रथा पाहून तिला खूप दुःख झाल्याचे सायमाने तिच्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. सोनी बनलेल्या सायमाने सांगितले की, तिची हिंदू धर्मावर आधीपासूनच श्रद्धा आहे. ती पूर्वीपासून हिंदू देवी-देवतांची पूजा करत आली आहे. सोमवारीच सोनीने अगत्स्य मुनी आश्रमात पंडित केके शंखधर यांच्या उपस्थितीत हाफिजगंज येथील आकाश सोबत विवाह केला. हा विवाह वैदिक रितीरिवाजांनुसार झाला. सायमाने पोलिसांना एक अर्ज दिला असून तिच्या कुटुंबियांना स्वतःच्या आणि पतीच्या सुरक्षेसाठी विनंती केली आहे. (Muslims)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.