RTE : ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ

मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध

654
RTE Admission : पुण्यात आरटीईचे 13,667 प्रवेश

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवारी १६ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ झाला आहे. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची मुदत मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ पर्यंत होती. या प्रक्रियेस शुक्रवारी १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (RTE)

(हेही वाचा – तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा; Amol Kolhe यांचे अजित पवारांना खुले आव्हान)

मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal (www नाही) या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील. (RTE)

कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही!

प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे. तसेच या प्रक्रियेसाठी दिनांक १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे देखील कंकाळ यांनी कळविले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी केले आहे. (RTE)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.