Lok Sabha Elections : Modi X Rahul कडून ‘मोदी विरुद्ध हम पांच’ कडे वाटचाल

पंतप्रधान पदासाठी इंडी आघाडीत एकमत होत नसल्याने पंतप्रधान पदाचा एक उमेदवार निश्चित होताना दिसत नाही.

214
Lok Sabha Elections : Modi X Rahul कडून ‘मोदी विरुद्ध हम पांच’ कडे वाटचाल

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे मार्गक्रमण करत असलेली लोकसभा निवडणूक, ‘मोदी विरुद्ध पाच वर्षात पाच पंतप्रधान’ म्हणजेच ‘मोदी विरुद्ध हम पांच’ या ‘ट्रॅक’वर चालली आहे. तर शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मंगळवारी ३० एप्रिल, २०२४ ला सकाळी पत्रकारांशी बोलताना, इंडी आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी एक नाही तर अनेक चेहेरे असल्याची कबुली देऊन मोदी यांच्या ‘इंडी आघाडीचे पाच वर्षात पाच पंतप्रधान’ या आरोपाला दुजोरा दिला. (Lok Sabha Elections)

इंडी आघाडीत पंतप्रधान पदावरून मतभेद

गेले काही दिवस भरकटत चाललेल्या देशपातळीवरील इंडी आणि राज्यातील महाविकास आघाडीची खिल्ली उडवत, मोदी यांनी विरोधी पक्षांमधील आपापसातील भांडणे चव्हाट्यावर आणली. इंडी आघाडीत अनेक राजकीय पक्ष एकत्र येत मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. मात्र त्यांच्यातही मतभेद आहेत. पंतप्रधान पदासाठी इंडी आघाडीत एकमत होत नसल्याने पंतप्रधान पदाचा एक उमेदवार निश्चित होताना दिसत नाही. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उत्तर मुंबई मतदार संघातून कॉंग्रेसच्या भूषण पाटलांना उमेदवारी)

‘एनडीए’चे पंतप्रधान पदासाठी एकमत

भाजपाप्रणित एनडीए आघाडीने एकमताने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तसे इंडी आघाडीकडून राहुल गांधी किंवा अन्य कुणाही नेत्याचे नाव जाहीर होत नसून इंडी आघाडीत पंतप्रधान पदासाठी अनेक इच्छुक आहेत. इंडी आघाडीचे सरकार आल्यास पाच वर्षात पाच पंतप्रधान बघण्याचे दुर्दैव जनतेच्या नशिबी येईल. तसेच प्रत्येक वर्षी नवा पंतप्रधान येऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे कामावून जाईल, असा आरोप मोदी यांनी केला. (Lok Sabha Elections)

ठाकरेंपासून गांधीपर्यंत

आज सकाळी राऊत यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, आमच्याकडे पंतप्रधान पदाचे एकापेक्षा जास्त आणि उत्तम चेहेरे आहेत, अशी कबुली दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राऊत यांनी ठाकरे हे देशाचे नेतृत्व करू शकतात, अशी पुडी सोडली होती. मात्र त्याला कोणत्याही राज्यातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राऊत यांनी ठाकरेंसाठी फिल्डिंग लावणे सोडून दिले. गेले काही महिने राऊत यांनी राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र उघडपणे राहुल गांधी यांचे नाव घेतल्यास इंडी आघाडीतील उरले-सुरले पक्षही सोडून जातील, अशी भीती असल्याने पंतप्रधान पदाच्या नावावर चर्चा करण्याची हिम्मतही इंडी आघाडी दाखवू शकत नाही. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.