हिंदू विवाहात आवश्यक विधी पार न पाडता केलेले लग्न वैध किंवा मान्य ठरू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रता याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. (Supreme Court)
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी आणि अशा प्रकारचे संस्कार व सोहळे आवश्यक आहेत. हिंदू विवाह म्हणजे नाच-गाणे किंवा वायनिंग-डायनिंग नसून हे एक संस्कार आहेत. त्यामुळे भारतीय समाजात याला एक महान मूल्य गृहित धरून उच्च दर्जा दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही तरुण आणि तरुणींना आग्रह करतो की, त्यांनी विवाह संस्थेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि भारतीय समाजातील ही संस्था किती पवित्र आहे याचा विचार करावा, असे न्यायमूर्ती बी नागरत्ना यांनी सांगितले. (Supreme Court)
(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : विराट कोहली फिरकीला खेळताना खरंच अडखळतोय का?)
विवाह देवाणघेवाण करण्याचा व्यवहार नाही
नाच-गाणे किंवा मद्य पिणे, जेवण करणे असा विवाहाचा अर्थ होत नाही. याशिवाय चुकीचा हट्ट धरून हुंडा, गिफ्ट यांची मागणे करणे किंवा इतर वस्तूची देवाणघेवाण करणे म्हणजे विवाह नाही. विवाह देवाणघेवाण करण्याचा व्यवहार नाही. भारतीय समाजामध्ये विवाहाला अत्यंत महत्त्व आहे. पुरुष आणि महिला यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा तो एक मार्ग आहे. भविष्यात तो अधिक विकसित होऊन कुटुंबामध्ये पती आणि पत्नीचा दर्जा घेत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. (Supreme Court)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community