विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी विमान इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम विमान प्रवासावर होणार आहे. (Air Travel Expensive)
विमानाच्या इंधन दरात वाढ झाल्यामुळे विमान प्रवास महागणार आहे. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, (१मे) पासून विमानाच्या इंधन दरात प्रति किलो ७४९.२५ रुपयांची वाढ झाली आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब )
इंधन दराचा आढावा…
दर महिन्याला तेल आणि वायू कंपन्या या विमानाच्या इंधनाच्या किंमतीसंदर्भात आढावा घेत असतात. त्यानंतर बाजारातील परिस्थितीनुसार इंधनाच्या किंमतीसंदर्भात कंपन्या निर्णय घेतात. मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत इंधनाचे दर कमी आहेत, तर कोलकातामध्ये सर्वात जास्त इंधनाचे दर आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात विमान इंधनाच्या किमती कमी झाल्या होत्या, तर मार्च महिन्यात इंधनाचे दर वाढले होते. मार्च महिन्यापूर्वी सलग ४ महिने विमान इंधनाचे दर घसरत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community