Harbour Line : हार्बर लाईनची लोकल पुन्हा रुळावरून घसरली; वाहतुकीचा खोळंबा

186

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर लाईनच्या (Harbour Line) मागे मंगळवारपासून शुक्ल काष्ट लागले आहे. मंगळवार, 30 एप्रिल रोजी हार्बर लाईनच्या लोकलचा डबा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे घसरल्याने वाहतून ठप्प झाली होती. आता बुधवारी पुनः सीएसएमटी रेल्वे स्थानकात लोकलचा डबा घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

(हेही वाचा Lok Sabha Election : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण असेल लोकांची पसंती, ‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’ ?)

सीएसएमटी स्थानकाजवळच चाचणी सुरू

गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा लोकलचा डबा रुळावरुन घसरण्याची घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकाजवळच चाचणी सुरू असताना रिकामी लोकल रुळावरुन घसरली आहे. या घटनेमुळे वडाळा-सीएसएमटी वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी, दुपारी १२ वाजताच्या सुमारास पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा डबा सीएसएमटी स्थानकाजवळ घसरला होता. यामुळे हार्बर रेल्वेची (Harbour Line) सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर बुधवारी पु्न्हा एकदा त्याच ठिकाणी चाचणी सुरू असताना लोकल रुळावरुन घसरली आहे. सोमवारी ज्या ठिकाणी रेल्वे रुळावरुन घसरली होती. त्याठिकाणी दुरुस्ती करुन लोकलची चाचणी घेतली जात होती. पण दुरुस्तीनंतरही पुन्हा लोकल घसरली आहे. यामुळे प्रवाशांची मात्र कोंडी झाली आहे. १ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने लोकल वाहतुकीवर नेहमीसारखा ताण नाही. असे असले तरी हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.