Split in Godrej : गोदरेज समूहाचं विभाजन अटळ

Split in Godrej : गोदरेज कुटुंबीयांनी आपल्या १२७ वर्ष जुन्या समुहाचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

306
Split in Godrej : गोदरेज समूहाचं विभाजन अटळ
  • ऋजुता लुकतुके

गोदरेज समुहाची वेगळी ओळख करून देण्याची भारतीयांना गरज नाही. ग्राहकोपयोगी वस्तू ते रिअल इस्टेट अशा सगळ्याच क्षेत्रात कंपनीचा विस्तार झालेला आहे. आणि कंपनीला १२७ वर्षांची मोठी परंपराही आहे. पण, आता गोदरेज कुटुंबीयांनी हा व्यवसाय पुढील पिढीकडे सोपवण्यापूर्वी त्याचं विभाजन करायचं ठरवलं आहे. ३० एप्रिलला उशिरा गोदरेज समुहाकडून देशातील शेअर बाजारांना तसं अधिकृतपणे कळवण्यात आलं आहे. (Split in Godrej)

गोदरेज कुटुंबीयांनी ‘कौटुंबिक मालमत्तेविषयीचा तह’ किंवा एफएसए शेअर बाजारात सादर केला आहे. आणि त्यात म्हटलंय की, ‘गोदरेज कंपनीचा विविध व्यवसायांतील विस्तार आणि कुटुंबाचा हिस्सा असलेल्या लोकांचा या व्यवसाय शाखांमधील रस आणि निर्णय क्षमता लक्षात घेऊन आम्ही कुटुंबीयांमध्ये गोदरेज समुहातील कंपन्यांचं विभाजन करण्याचं ठरवलं आहे.’ (Split in Godrej)

झालेल्या निर्णयानुसार, आदी आणि नादिर गोदरेज यांच्याकडे समुहातील नोंदणीकृत कंपन्यांचा ताबा असेल. तर त्यांचा चुलत भाऊ जमशेद यांच्याकडे समुहाच्या मालकीच्या जमिनी आणि इतर कंपन्यांचा ताबा असेल. हा करार प्रत्यक्षात येण्यासाठी एक तारीख ठरवली जाईल. आणि त्या तारखेपर्यंत समुहाचं कामकाज आहे तसं चालवलं जाईल. आणि त्यानंतर मात्र परस्पर सामंजस्याने समभागांची देवाण घेवाण किंवा ओपन ऑफर काढली जाईल. गोदरेज कंपनीच्या ट्रेडमार्कवर हा दोन्ही शाखांचा समान अधिकार असेल. (Split in Godrej)

(हेही वाचा – Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वतःला तिहार रिटर्न का म्हटले?)

गोदरेज समुहात ‘या’ उत्पादनांच्या शाखा 

गोदरेज समुहात भावंडांचे दोन गट आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स ही कंपनी आदी आणि नादिर हे दोघे भाऊ चालवतात. तर गोदरेज अँढ बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही या दोघांचे चुलत भाऊ जमशेद आणि त्यांची बहीण स्मिता चालवतात. समुहात अभियांत्रिकी वस्तू, गृहोपयोगी उपकरणं, सुरक्षाविषयक साधनं, कृषी उत्पादनं, रिअल इस्टेट आणि ग्राहकोपयोगी वस्तू अशा उत्पादनाच्या शाखा आहेत. (Split in Godrej)

१८९७ साली आर्देशीर आणि पिरोजशा गोदरेज या भावांनी मिळून या समुहाची मुहूर्तमेढ रोवली होती. स्वत:च्या व्यवसाय शाखांबरोबरच इतर नवीन व्यावसायिकांना आणि कंपन्यांना मदत करण्यासाठीही हा समुह ओळखला जातो. समुहाची गोदरेज ॲग्रोवेट व्यवसायात ६५ टक्के, गोदरेज प्रॉपर्टी व्यवसायात ४७ टक्के आणि गोदरेज कन्झ्युमर कंपनीत २४ टक्के हिस्सेदारी आहे. समुहाच्या पाच नोंदणीकृत कंपन्या आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि ॲस्टेक लाईफसायन्सेस या कंपन्या नोंदणीकृत आहेत. आणि या कंपन्यांचं एकूण भाग भांडवल हे १.२६ लाख कोटी रुपयांचं आहे. (Split in Godrej)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.