- ऋजुता लुकतुके
बँकिंग व्यवहारांची सुरक्षा आणि गुप्तता या गोष्टी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण, शहरांबाहेर किंवा निमशहरांमधील बँकांमध्ये अशा सक्षम सुरक्षा यंत्रणेचा अभाव असतो. सायबर सुरक्षा (Cyber security) हा विषय महत्त्वाचा असला तरी इंटरनेटची उपलब्धता आणि त्याचा वेग ही समस्या या बँकांना (Bank) भेडसावते. त्यासाठीच सेलेरिटी एक्स कंपनीने भारतात वन एक्स हे नवीन सायबर सुरक्षा उत्पादन आणलं आहे. बँकांची नेटवर्क सुरक्षा, त्याचं व्यवस्थापन तसंच लॅन साईट नियंत्रण करणारं असं ये युनिफाईड नेटवर्क सोल्यूशन असेल. (Banking Security Solution)
निमशहरं आणि गावांमध्ये बँकांना अशा नेटवर्कची गरज पडणार आहे. त्यामुळे बँकांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सेलेरिटी एक्स कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या संस्थेशी धोरणात्मक भागिदारीही केली आहे. या माध्यमातून राज्यातील ४०,००० लहान बँकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे. समता सहकारी पतसंस्थेकडून कंपनीला सुरुवातीची ऑर्डरही मिळाली आहे. (Banking Security Solution)
(हेही वाचा – Banganga : मुंबईत प्रती वाराणसी; बाणगंगाच्या तटावर होणार गंगा आरती)
वन एक्सकडे देशातील १,००,००० बँक शाखांना एकमेकांशी सुरक्षितपणे जोडण्याची क्षमता
सेलेरिटी एक्स ही देशातील चौथी मोठी खाजगी आयएसपी कंपनी हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सची उपकंपनी आहे. वन एक्स हे उत्पादन सध्या राज्यांतील १,००,००० बँक शाखांना सुरक्षित आणि अपटाईम कनेक्टिव्हिटी सेवा देण्याची क्षमता असलेलं उत्पादन आहे. वन एक्स उत्पादनाच्या लाँचला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयते उपस्थित होते. (Banking Security Solution)
‘महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांची कामगिरी आता राष्ट्रीयीकृत बँकांच्या जवळ जाणारी आहे. बँकांचा कारभारही ऑनलाईन झाला आहे. अशावेळी बँकांच्या सायबर सुरक्षेचं (Cyber security) महत्त्व लक्षात घेऊन संस्थेनं वन एक्स बरोबर काम करायचं ठरवलं आहे,’ असं कोयते यावेळी बोलताना म्हणाले. वन एक्सकडे देशातील १,००,००० बँक शाखांना एकमेकांशी सुरक्षितपणे जोडण्याची क्षमता आहे या गोष्टीकडे वन एक्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी समीर कणसे यांनी लक्ष वेधलं. (Banking Security Solution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community