मुंबई पोलीस मुख्यालयात ‘लॉकअप’ मध्ये असलेल्या सलमान खान हल्ला प्रकरणातील आरोपीपैकी एकाने बुधवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येचा तपास राज्य अन्वेषण विभागाकडे (CID)कडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे अधिकारी यांनी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. (Salman Khan)
अनुज थापन असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अनुज थापन हा मूळचा पंजाब राज्यातील जालंदर येथे राहणारा आहे. गेल्या आठवड्यात अनुज थापन आणि त्याचा साथीदार सोनू चंदर या दोघांना मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने पंजाब येथून अटक केली होती. अनुज आणि सोनू या दोघांनी सलमान खानच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना शस्त्रे पुरवली होती असे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले होते. या गुन्ह्यातील आरोपी अनुज थापन आणि त्याचे इतर दोन सहकारी असे एकूण ३ जण ८ मे पर्यत गुन्हे शाखेच्या कोठडीत होते. (Salman Khan)
(हेही वाचा – Hatkanangale Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मानेंसमोर राजू शेट्टी आणि सत्यजित पाटलांचे आव्हान)
सलमान खान प्रकरणात एकूण चार जणांना अटक
गुन्हे शाखेची कोठडी (लॉकअप) ही मुंबई पोलीस मुख्यालयाच्या आवारात आहे. बुधवारी सकाळी अनुज याने कोठडीत शाैचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली, त्याच्यावर दबाव होता का? याचा तपास करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. (Salman Khan)
सलमान खान प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आलेली होती, त्यात हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांचा समावेश होता. गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या इशाऱ्यावरून परदेशात बसलेला लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोई याने या हल्ल्याचा कट रचून हल्ल्यासाठी शस्त्र आणि आर्थिक रसद पुरवल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेने या प्रकरणात लॉरेन्स आणि अनमोल यादोघांना आरोपी बनवले असून अनमोल विरुद्ध ‘एलओसी’ (लूक आउट नोटीस) जारी केली आहे. दरम्यान गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आलेला आहे. मोक्का कायद्याचे तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. (Salman Khan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community