Maharashtra Weather : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसणार!

176
Maharashtra Weather : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसणार!
Maharashtra Weather : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसणार!

गेल्या दोन दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात (Maharashtra Weather ) प्रचंड वाढ झाली आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा (Maharashtra Weather ) दिला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट कायम असणार आहे. भरउन्हात दुपारच्या (Maharashtra Weather ) वेळी घराबाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे मराठवाडा (Marathawada) आणि विदर्भात (Vidarbh) पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता कायम आहे.

काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज

पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट (Maharashtra Weather ) आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather )

मुंबई, ठाणेसह कोकणात उन्हाच्या झळा

कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल. मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. (Maharashtra Weather )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.