Devendra Fadnavis: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

378
Devendra Fadnavis: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्ही मुख्यमंत्री बना असा उद्धव ठाकरेंचा फोन आल्यााचा सनसनाटी गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. (Devendra Fadnavis)

शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र वेळ निघून गेली होती. 2022 सालाच्या सत्ता स्थापनेच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले.आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पार्टी घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करु.” (Devendra Fadnavis)

जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बेईमानी करणार नाही

“मिलिंद नार्वेकरांनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यांना म्हणालो, उद्धवजी वेळ निघून गेली आहे. आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करु शकता. माझ्या पातळीवर हा निर्णय संपलेला आहे. आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बेईमानी करणार नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला की नाही, या विषयी मला कल्पना नाही.” असे देखील देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.