महायुतीचे उमेदवार (Raj Thackeray) म्हणून ठाण्यातून शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोघांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भेट घेतली.
(हेही वाचा –Jharkhand Congress X Account Withheld : अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई; झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड)
मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत खासदार शिंदे यांच्या करता खास मनसे मेळावा ठेवला होता. दरम्यान येत्या १२ मे ला कल्याण डोंबिवली येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.(Raj Thackeray)
(हेही वाचा –Devendra Fadnavis: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. श्रीकांत शिंदेंकडून राज ठाकरेंना गणपतीची मूर्तीही भेट देण्यात आली. राज ठाकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेणार आहेत. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे त्यांची कणकवलीत सभा होणार असल्याची माहिती आहे. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community