- ऋजुता लुकतुके
या आयपीएलमध्ये ताशी १५५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करून सगळ्यांचं लक्ष वेधणारा मयंक यादव दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकण्याची चिन्हं आहेत. पण, एरवी बीसीसीआयचंही (BCCI) लक्ष त्याने वेधल्यामुळे त्याला बोर्डाकडून कंत्राण मिळण्याचीही शक्यता आहे. या हंगामात एका महिन्यात दुसऱ्यांदा त्याला दुखापत जडली आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने तीनच षटकं टाकली आणि नंतर तो मैदानातून बाहेर गेला. तेव्हा कळलं की, त्याच्या पोटाचा स्नायू दुखावलाय. (IPL 2024 Mayank Yadav)
आणि यावेळी तो आयपीएलमधून (IPL) बाहेर पडण्याचीच शक्यता आहे. ही नकारात्मक गोष्ट असली तरी बीसीसीआयकडून मिळणारं संभाव्य कंत्राट नक्कीच सुखावणारं असेल. या कंत्राटामुळे तो उमरान मलिक, यश दयाल, आकाशदीप, कावेरअप्पा आणि व्यक्ष विजयकुमार यांच्या बरोबरीने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करेल. सध्या भारतीय संघात बुमरा, सिराज आणि शामी यांच्यानंतर राखीव तेज गोलंदाजांची उणीव आहे. त्यामुळेच युवा खेळाडूंना तयार करण्याचा हा बीसीसीआयचा प्रयत्न असेल. (IPL 2024 Mayank Yadav)
त्याचबरोबर मयंकला मुंबई विरुद्धच्या सामन्यात देशातील नंबर वन तेज गोलंदाज जसप्रीत बुमराबरोबरही वेळ घालवता आला. (IPL 2024 Mayank Yadav)
Who else than the purple-cap holder himself with some valuable advice for budding pacers 🤗#TATAIPL | #LSGvMI | @mipaltan | @LucknowIPL | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/592BTpK6ru
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2024
(हेही वाचा – Mumbai Crime : रेल्वेतील फटका गॅंगने घेतला मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा बळी)
‘ही’ गोष्ट युवा मयंकला शिकण्यासारखी
बुमरा त्याच्या अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर दुखापतींनंतर पुनरागमन करतानाही अचूकता कायम ठेवण्याचं कौशल्य त्याने अनुभवाने आत्मसात केलं आहे. खेळापासून ब्रेक घेतलेला असला तरी त्याची लय बिघडत नाही. ही गोष्टही युवा मयंकला शिकण्यासारखी आहे. (IPL 2024 Mayank Yadav)
मयंकने या आयपीएलमध्ये सातत्याने १५० प्रतीतास वेगाने गोलंदाजी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचबरोबर पदार्पणाच्या दोन्ही आयपीएल (IPL) सामन्यांत ३-३ बळी टिपत तो सामनावीरही ठरला होता. त्याच्या वेगाला अचूकतेची जोड आहे. पण, त्यानंतर गोलंदाजी करतानाच त्याचा पोटाचा स्नायू दुखावलाय. त्यामुळे लखनौचा कर्णधार के एल राहुल आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मयंकला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (IPL 2024 Mayank Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community