पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (२ मे) गुजरातमधील आनंद येथील प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं दिली. यावेळी त्यांनी काँग्रेससह (Congress) इंडी आघाडीवर टीका केली. यावेळी ते (PM Narendra Modi) म्हणाले, “माझी काँग्रेसला तीन आव्हानं आहेत. काँग्रेससह त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने ही आव्हानं स्वीकारून दाखवावीत. माझं पहिलं आव्हान आहे की काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्चांनी या देशाला लिखित स्वरूपात गॅरंटी द्यावी की ते आपल्या देशाचं संविधान बदलून धर्माच्या आधारावर मुसलमानांना आरक्षण देणार नाहीत, देशाची फाळणी करणार नाहीत.” (PM Narendra Modi)
आरक्षणावर दरोडा टाकणार नाही
“माझं दुसरं आव्हान आहे की, काँग्रेसने नागरिकांना लिहून द्यावं की ते अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गांना (ओबीसी) दिलेलं आरक्षण कमी करणार नाहीत, त्यात कुठल्याही प्रकारचा मोडता घालणार नाहीत. त्यांचे अधिकार हिरावणार नाही, त्यांच्या आरक्षणावर दरोडा टाकणार नाही.” (PM Narendra Modi)
मतांचं राजकारण करणार नाहीत
“माझं काँग्रेससह इंडी आघाडीला तिसरं आव्हान आहे की, त्यांनी देशाला लिखित स्वरूपात गॅरंटी द्यावी की ज्या ज्या राज्यात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे. तिथे ते कधीही मतांचं (व्होटबँकेचं) राजकारण करणार नाहीत. आरक्षणातील ओबीसींचा वाटा कमी करून मुसलमानांना आरक्षण देणार नाहीत.” (PM Narendra Modi)
काँग्रेस माझी ही तीन आव्हानं कधीच स्वीकारणार नाही, कारण …
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “काँग्रेसने माझी ही तीन आव्हानं स्वीकारून दाखवावित. काँग्रेसच्या युवराजांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे करून दाखवावं. नुसतं संविधानाला डोक्यावर घेऊन नाचून काहीच होणार नाही. संविधानासाठी जगणं आणि मरणं काय असतं ते शिकायचं असेल तर मोदीकडे या. मला माहिती आहे काँग्रेस माझी ही तीन आव्हानं कधीच स्वीकारणार नाही, कारण त्यांचे हेतू घाणेरडे आहेत.” असा घणाघात पंतप्रधानांनी यावेळी केला. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community