T20 World Cup 2024 : भारत – पाक सामन्यासाठी न्यूयॉर्कमधील नसॉ स्टेडिअम सज्ज 

T20 World Cup 2024 : भारताचे चारही साखळी सामने याच मैदानात होणार आहेत 

203
T20 World Cup 2024 : भारत - पाक सामन्यासाठी न्यूयॉर्कमधील नसॉ स्टेडिअम सज्ज 
T20 World Cup 2024 : भारत - पाक सामन्यासाठी न्यूयॉर्कमधील नसॉ स्टेडिअम सज्ज 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) आयोजनासाठी अमेरिकेत दोन क्रिकेट स्टेडिअम नव्याने तयार होत आहेत. आणि त्यातीलच एक आहे न्यूयॉर्कमधील नसॉ काऊंटीचं (nassau county stadium) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम. बांधकाम आता अंतिम टप्प्यात असलं तरी स्पर्धेसाठीच्या १० खेळपट्ट्या आता पूर्णपणे तयार झाल्या आहेत. ॲडलेडच्या एका कंपनीकडून या तयार खेळपट्ट्या मागवण्यात आल्या होत्या. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं!)

या कंपनीने फ्लोरिडा राज्यात या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. आणि तिथून त्या न्यूयॉर्कला (New York) आणण्यात आल्या आहेत. आता इथे त्या मैदानावर बसवण्यात येतील. यातील ४ या मुख्य स्टेडिअमवर बसवण्यात येतील. आणि उर्वरित सहा या सरावाच्या ठिकाणी बसवण्यात येतील. (T20 World Cup 2024)

फ्लोरिडाहून न्यूयॉर्कमध्ये या खेळपट्ट्या आणण्यासाठी २० सेमी-ट्रेलर ट्रकची मदत घेण्यात आली. ॲडलेड ओव्हल मैदानाचे मुख्य क्युरेटर डॅमिएन ह्यू यांनी खेळपट्ट्यांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. ‘सगळं काही नियोजनाप्रमाणे सुरू आहे. आणि बनवलेल्या खेळपट्ट्याही मनासारख्या तयार झाल्या आहेत. त्या बसवण्याचं कामही चोखच होईल. तर येत्या काही दिवसांत स्टेडिअम आयोजनासाठी तयार असेल,’ असं ह्यू म्हणाले. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- IPL 2024, Rohit Sharma Banter : लखनौ विरुद्धच्या सामन्या दरम्यान रोहित आणि अमित मिश्रा यांच्यात वयावरून चिडवाचिडवी)

मॅनहॅटनच्या पूर्वेला नसॉ काऊंटीमध्ये (nassau county stadium) आयसेन हॉवर पार्क इथं हे स्टेडिअम तयार होत आहे. या स्टेडिअमची आसन क्षमता ३४,००० प्रेक्षकांची आहे. आणि स्पर्धेदरम्यान एकूण ८ सामने इथे होणार आहेत. २० पैकी ९ संघ इथं किमान एक सामना खेळतील. यातच भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या प्रतिष्ठेच्या लढतीचा समावेश आहे. ९ जूनला हा सामना होणार आहे. याशिवाय अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड्स आणि बांगलादेश हे संघ या मैदानावर खेळणार आहेत. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.