Lok Sabha Election : माजी आमदार विजय औटींच्या निर्णयामुळे अहमदनगर दक्षिणच्या ‘या’ उमेदवाराला बसणार फटका

लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून झाल्यानंतर औटी यांनी मंगळवारी निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

183

अहमदनगर जिल्ह्यातून सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पारनेरचे माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी पारनेरमध्ये तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यांनी भूमिका जाहीर करत महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच औटी यांनी विखे यांना पाठिंबा दिल्यामुळे माजी आमदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून झाल्यानंतर औटी यांनी मंगळवारी निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

(हेही वाचा PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेतून काँग्रेसला तीन आव्हानं!)

महाविकास आघाडीला फटका बसू शकतो

लोकसभेत अनुभवी नेतृत्व अहमदनगर दक्षिणमधून निवडून जावे व त्याचा फायदा नगर जिल्ह्याच्या जनतेला व्हावा अशी भूमिका या मागे असल्याचे विजय औटी सांगतात. पण असे करत असताना त्यांच्या या कृतीमुळे महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो. पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ साली झालेल्या निवडणुकीत निलेश लंके यांनी विजय औटी यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याआधी निलेश लंके हे देखील मूळचे शिवसैनिकच होते. परंतु शिवसेनेत पटत नसल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.