आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्या मनमानीपणामुळे दिल्ली महिला आयोगाच्या २२३ कर्मचाऱ्यांना नोकरीस मुकावे लागले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा मालीवाल यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी २२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र, ही नियुक्ती बेकायदेशीर असल्यामुळे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना आज, गुरुवारी (२ मे) २२३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे लागले. (AAP)
आम आदमी पक्षातील नेत्यांच्या मनमानीचे आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे. आपच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता मनमानी पध्दतीने २२३ कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. या नियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली होती. परंतु, हा आनंद औटघटकेचाच ठरला. (AAP)
दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी गुरुवारी सर्व २२३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला. यामुळे कर्मचाऱ्यांपुढे नवीन संकट निर्माण झाले आहे. मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन उपराज्यपालांची परवानगी न घेता नियुक्ती केल्याचा आरोप आहे. (AAP)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : अमेरिकेतील टी-२० विश्वचषक स्पर्धा ही लॉस एंजलिस ऑलिम्पिकची नांदी)
मान्यतेशिवाय नियुक्ती
दिल्ली महिला आयोगातील मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या ४० एवढी आहे. याव्यतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर उपराज्यपालांची मंजूरी घेऊन काही पदे निर्माण करता येतात आणि त्यानंतर नियुक्ती करावी लागते. परंतु, मालीवाल (Swati Maliwal) यांनी मंजुरी न घेताच २२३ कर्मचारी नियुक्त केले. (AAP)
एलजी कार्यालयाच्या आदेशानुसार, आयोगाला कर्मचाऱ्यांना करारावर घेण्याचा अधिकार नाही. वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय महिला आयोगाने नियुक्तीबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल. या नियुक्त्यांसाठी वित्त विभागाची परवानगी घेण्याचा सल्लाही त्यांना वारंवार देण्यात आला होता. परंतु त्यांनी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले, असे स्पष्टीकरण एलजीच्या आदेशात देण्यात आले आहे. (AAP)
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) या दिल्ली महिला आयोगाच्या नऊ वर्षांपर्यंत अध्यक्षा होत्या. त्यांनी यावर्षी ५ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या पॅनलचे अध्यक्षपद रिक्त आहे. (AAP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community