TMC आमदार हुमायून कबीर यांची हिंदूंना धमकी, प. बंगालमध्ये ७० टक्के Muslim आहेत हिंदूंना भागीरथी नदीत बुडवू 

322
TMC आमदार हुमायून कबीर यांची हिंदूंना धमकी, प. बंगालमध्ये ७० टक्के Muslim आहेत हिंदूंना भागीरथी नदीत बुडवू 

लोकसभा निवडणुक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तयारीदरम्यान, पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेस (TMC) आमदार हुमायून कबीर यांनी हिंदूंना धमकी दिली आहे. प्रचार करताना हुमायून कबीर (Humayun Kabir) म्हणाले आहेत की ते ‘दोन तासांत हिंदूंना भागीरथी नदीत (Bhagirathi River) (गंगा) बुडवून टाकतील.’ कबीर यांच्या या विधानावर जोरदार टीका होत असून, हुमायून कबीर हे भरतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भरतपूर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यात येते. अलीकडेच त्यांनी बहरामपूरमधून टीएमसीचे उमेदवार युसूफ पठाण यांचा प्रचारही केला होता. याशिवाय अनेक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला होता. एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ही वादग्रस्त टिप्पणी केली. दरम्यान सोशल मीडियावर बेताल वक्तव्यांचा व्हिडीओ वायरल होत आहे. (Muslim)  

(हेही वाचा – चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच समजली; Sharad Pawar यांचा गौप्यस्फोट)

निवडणूक रॅलीला संबोधित करताना हुमायून कबीर म्हणाले, “तुम्ही (हिंदू) ७० टक्के आहात आणि आम्ही (मुसलमान) ३० टक्के आहोत. इथे तुम्ही काझीपाड्याची मशीद (Qazipada Masjid) पाडाल आणि बाकीचे मुस्लिम शांत बसतील, हे शक्य होणार नाही. मी भाजपाला सांगू इच्छितो की असे कधीही होणार नाही. सर्व हिंदू भागीरथी नदीत २ तासांत वाहून गेले नाही तर मी राजकारण सोडेन. असे बेताल वक्तव्य हुमायून कबीर यांनी केले.  (Muslim)

पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्ष TMC ने क्रिकेटर युसूफ पठाण (Cricketer Yusuf Pathan) यांना लोकसभा निवडणुकीसाठी बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. पुढे हुमायून कबीर म्हणाले की या पक्षाने उमेदवार बदलला नाही तर बहारमपूरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांना दुसऱ्या राज्यातून आणून पराभूत करता येणार नाही, असे कबीर यांनी विधान केले. मुर्शिदाबाद जिल्हा मुस्लिम (Muslim) बहुल आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७५ टक्के मुस्लिम आहेत. येथील बहुतांश लोकसंख्या विडी बनविण्याचा व्यवसायात गुंतलेली आहे. मुर्शिदाबाद (Murshidabad) ही एकेकाळी बंगालची राजधानी होती. येथील हजारद्वारी पॅलेस हा त्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे, तरीही बहुतांश लोक गरिबीत जीवन जगत आहेत. (Muslim)

(हेही वाचा – Road Side Drain : पेटीका नाल्यांमधील काढलेला गाळ सुकल्यानंतरही तिथेच, रस्त्यालगत लोकांकडून तुडवला जातो गाळ)

यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय () यांनी बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. शक्तीपूर येथील बूथ कार्यकर्ता परिषदेत कबीर यांच्या वक्तव्यावर त्यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’ वर लिहिले, “मुर्शिदाबादमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत. फक्त २८ टक्के आहेत. तर कल्पना करा, बाकी बंगालमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले तर काय होईल. ते पुढे म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये राजकारण खालच्या पातळीवर पोहोचले आहे. ममता बॅनर्जी यांचे आभार. बंगालमधील हिंदू आता द्वितीय श्रेणीतील नागरिकांपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. या आमदाराला पक्षातून हाकलून देण्याचे धाडस ते करतील का? हिंदूंच्या विरोधात सतत विष पसरवणारे हे विचारवंत एक शब्दही बोलण्याची हिंमत करू शकत नाहीत. असे विधान अमित मालवीय यांनी केले.   (Muslim)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.