खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी यावर्षीदेखील २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. या दुय्यम अभियंत्यांनी समर्पित भावनेने कामकाज करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे हे दुय्यम अभियंते स्वत:हून शोधतील आणि ही रस्ते दुरूस्ती वेळेत होते का, याची दक्षता घेणार आहेत. (Road Pothole)
दुय्यम अभियंते हे खड्डयांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामांचा आढावा घेत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. आयुक्त म्हणाले की, दुय्यम अभियंते हे २२७ निवडणूक प्रभागात प्रत्यक्ष फिरून खड्डयांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील. तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर परिमंडळनिहाय नेमलेल्या कंत्राटदारामार्फत मास्टिक अस्फाल्टद्वारे खड्डे बुजविण्यात आले आहेत का, याची खातरजमा दुय्यम अभियंता करतील. (Road Pothole)
(हेही वाचा – पालघर लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून Dr. Hemant Savra यांना उमेदवारी जाहीर)
प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही
ही यंत्रणा उभी करण्यामागे, रस्त्यावर पडलेले खड्डे दुय्यम अभियंत्यांनी स्वत:हून शोधावेत, रस्ते दुरूस्ती वेळेत होते का, याची दक्षता घ्यावी, हा हेतू आहे. तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे व समाजमाध्यमे यांच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असाही उद्देश आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एकूणच रस्त्यावर खड्डा आढळल्यानंतर तो तातडीने बुजविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दुय्यम अभियंत्यांना देण्यात आले आहेत. पावसाळ्यात मुंबईकर नागरिकांना खड्डे समस्या जाणवू नये, वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन (Municipal Administration) कटिबद्ध असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (Road Pothole)
खड्डे दुरूस्ती करता १४ कंत्राटदारांची नेमणूक
पावसाळापूर्व कामांचा महत्वपूर्ण भाग म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती कामांसाठी महापालिकेच्या ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. (Road Pothole)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community