Kolhapur Shahu Chhatrapati adoption: कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे आजोबा शहाजी महाराजही दत्तक

कोल्हापूरच्या शाहू छत्रपती यांनी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापूरचे राजकीय वातावरणच ढवळून निघाले. छत्रपती घराण्याला एक वेगळं वलय असून ते पक्षातीत होते

344
Kolhapur Shahu Chhatrapati adoption: कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे आजोबा शहाजी महाराजही दत्तक
Kolhapur Shahu Chhatrapati adoption: कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे आजोबा शहाजी महाराजही दत्तक
  • सुजित महामुलकर

कोल्हापूरचे शाहू छत्रपती (Kolhapur Shahu Chhatrapati adoption) हे राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत तर दत्तक आहेत, या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या विधानानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. मात्र, शाहू छत्रपतीच नाही तर त्यांना दत्तक घेणारे त्यांचे आजोबा शहाजी महाराज हे देखील दत्तक गेले होते, अशी खळबळजनक माहिती राजर्षी शाहू महाराजांचे सुपुत्र, छत्रपती राजाराम महाराजांची (Chhatrapati Rajaram Maharaj) नातसून माधुरी कदमबांडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.  (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- Lok Sabha Election : उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर)

कोल्हापूरच्या (Kolhapur) शाहू छत्रपती यांनी कॉँग्रेस (Congress) पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापूरचे राजकीय वातावरणच ढवळून निघाले. छत्रपती घराण्याला एक वेगळं वलय असून ते पक्षातीत होते. २००९ मध्ये छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसते. छत्रपती शाहू यांनी मात्र यावेळी कॉँग्रेसचा ‘हात’ हातात घेत ७६ व्या वर्षात राजकारणाच्या दलदलीत उतरले. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

राज्यातील श्रीमंत उमेदवार

शाहू छत्रपती यांची मालमत्ता यानिमित्ताने जगजाहीर झाली. राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणूनही त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी उमेदवार अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात रुपये ३८२ कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- PM Narendra Modi यांच्या दाव्याला मिळाला पुरावा; पाकिस्तानी सोशल मीडियातून राहुल गांधींचा होतोय उदोउदो)

गौप्यस्पोठ

कॉँग्रेसच्या (Congress) छत्रपती शाहू यांचे राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी चंदगड येथील निवडणूक प्रचारादरम्यान थेट शाहू महाराज खरे वारसदार नसून दत्तक असल्याचा मुद्दा काढला आणि प्रचाराला वेगळी दिशा मिळाली. यानिमित्ताने दत्तक मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आणि काही गौप्यस्पोठ होऊ लागले. यातीलच एक म्हणजे शाहू छत्रपती यांचे आजोबा शहाजी महाराज, ज्यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतले, तेदेखील या घरात दत्तक म्हणून आले आहेत. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज (तिसरे) आणि त्यांची एकुलती एक कन्या पद्माराजे. या पद्माराजे यांच्या धाकट्या मुलाची, प्रियदर्शन कदमबांडे, यांची पत्नी माधुरी कदमबांडे (५५) यांच्याशी संपर्क साधला असता काही गोष्टी जनतेसमोर आल्या. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- नोबल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ Alfred Kastler)

हीच वेळ का?

सर्वाधिक कळीचा मुद्दा हा की, दत्तक मुद्दा चर्चेला येण्याची हीच वेळ का? तर, राजकारणाच्या दलदलीत कधी, कुणावर चिखलफेक होईल, याचा नेम नाही. निवडणूक प्रचाराचा मुद्दा म्हणून कदाचित हा विषय समोर आला असे गृहीत धरले तरी मुद्दा तथ्यहीन नाही, हे स्पष्ट झाले. आजची पिढी बहुदा या दत्तक मुद्द्याबाबत अनभिज्ञ होती, त्यांच्यासाठी ही नवी माहिती मिळाली. थोडक्यात, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ उघडली गेली. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

सत्यासाठी बोलावे लागले

माधुरी कदमबांडे यांना ‘आताच कदमबांडे कुटुंब जनतेसमोर येण्याचे कारण काय?’ असे विचारले असता त्या म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांत समाजमध्यमावर आणि निवडणूक प्रचारात काही चुकीच्या गोष्टींचा प्रसार होतो आहे असे दिसून आले आणि ते खोडून काढण्यासाठी बोलावे लागत आहे. ‘राजाराम महाराज निपुत्रिक होते’ हा यात सगळ्यात मोठा अपप्रचार होत आहे. ही चुकीची माहिती नव्या पिढीसमोर जाऊ नये. राजाराम महाराज यांना एक कन्या होत्या, पद्माराजे आणि पद्माराजे यांना पाच अपत्य. राजवर्धन, यशोवर्धन आणि प्रियदर्शन हे सुपुत्र आणि शिवप्रिया आणि वसुंधरा या कन्या. यातील यशोवर्धन आज हयात नाहीत. तसेच काही लोक कदमबांडे कोण? असा  प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी आणि कदमबांडे कोण हे सांगण्यासाठी बोलावे लागले. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- विखे पाटलांना साथ देणं Vijay Auti यांना भोवलं)

खरे वारसदार

माधुरी यांनी सांगितले, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना चार अपत्ये होती. आऊबाई, राधाबाई (अक्कासाहेब), राजाराम आणि प्रिन्स शिवाजी. यातील आऊबाई यांचे लहानपणी निधन झाले. प्रिन्स शिवाजी यांनी तारुण्यात शिकारी दरम्यान प्राण गमावला. राधाबाई म्हणजेच अक्कासाहेब यांचा विवाह तुकोजीराव पवार यांच्याशी झाला तर राजाराम महाराज यांचा विवाह बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या नात आणि फत्तेहसिंह यांची कन्या ताराबाई यांच्याशी झाला आणि त्यानंतर दुसरा विवाह तंजावर सरदार मोहिते घराण्यातील विजयमाला यांच्याशी झाला,” असे माधुरी यांनी स्पष्ट केले. तसेच राजाराम महाराज आणि ताराबाई यांची कन्या पद्माराजे या खऱ्या वारसदार असल्याचा दावाही माधुरी यांनी केला. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

चार अपत्ये असलेले पिता गेले दत्तक

“ताराबाई आणि राजाराम यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे. पद्माराजे यांचा जन्म झाल्यानंतर ४० दिवसांतच राजाराम महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर अक्कासाहेब (राजाराम यांची बहीण) पुण्याहून कोल्हापूरला राहायला आल्या. दरम्यान, ब्रिटिश सरकारने कोल्हापूर गादीला पुरुष वारसदार हवा यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली तर अक्कासाहेबांनी त्याचे पुत्र विक्रमसिंह पवार यांना दत्तक घेण्यास भाग पाडले. विक्रमसिंह यांचे वय त्यावेळी ४० वर्षे होते. त्यांचे लग्न झाले होते आणि ३ मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये होती. त्यांचा आधीच राज्याभिषेक देवासच्या गादीवर झालेला असताना, मुलाला त्या गादीचा वारस करून स्वतः कोल्हापुरच्या गाडीवर बसले,” असे माधुरी यांनी स्पष्ट केले. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- NADA India : डोपिंग विरोधात जनजागृती करण्यासाठी क्रीडाप्रेमींचा सहभाग)

“गादीवर बसताच ताराराणी यांना बाजूला केले गेले. त्यांची तब्बेत लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॉरफीनचा डोस सुरू झाला. मात्र त्याचा कोर्स संपल्यानंतरही डोस बंद करण्यात आला नाही आणि त्याचे ताराराणी यांच्या तब्बेतीवर दुष्परिणाम होऊन त्या ॲडीक्ट झाल्या. त्यांच्या पश्चात विजयमाला यांनी पदमाराजे यांचे पालनपोषण केले. पुढे पदमाराजे यांचे लग्न शिरपूरपासून ३० किमी आत तोरखेड संस्थानिक घरात सरदार रघुजीराव भगवंतरव कदमबांडे यांच्याशी लाऊन देण्यात आले. पद्माराजे यांचे बाळंतपणदेखील कोल्हापुरात होऊ दिले नाही,” असे माधुरी यांनी सांगितले. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

पुढे शहाजी महाराजांना कन्या झाली मात्र गादीला वारस नशिबात नव्हता. १९६२ मध्ये त्यांनी मुलीच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि ही बातमी वाऱ्यासारखी कोल्हापुरात पसरली. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. विरोध झाला. शहाजी महाराजांना समजावण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण कुणालाही न जुमानता शहाजी महाराजांनी आपल्या मुलीच्या मुलाला दत्तक घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- Road Pothole : रस्त्यांवरील खड्डे महापालिकेचे अभियंते स्वतः शोधणार, आणि….)

दिलीपसिंह झाले युवराज शाहू

लोक राजवाड्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. अशा वातावरणात एक तरुण राजवाड्याच्या टॉवर वर चढला आणि त्याने तेथील ‘भगवा झेंडा काढून त्याठिकाणी काळा झेंडा लावला’..! छत्रपती शहाजी महाराजांनी ही परिस्थिती लक्षात घेतली आणि १२ जुलै १९६२ ला जो दत्तक विधान समारंभ व्हायचा होता तो त्यांनी मोठ्या गुप्ततेने २८ जुन १९६२ ला बेंगलोर येथे जाऊन पार पाडला. त्यात कोल्हापूर संस्थांनचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराज यांनी त्यांची कन्या नागपूरच्या शालिनी राजे यांचा मुलगा दिलीपसिंहराव यांना वारस म्हणून दत्तक घेतले आणि दत्तक विधाननंतर दिलीपसिंह यांचे ‘युवराज शाहुराजे’ असे नामकरण झाले. हेच ते विद्यमान छत्रपती शाहु महाराज, असे सांगण्यात येते. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

(हेही वाचा- राजकारणी, मुत्सद्दी आणि संरक्षण मंत्री V. K. Krishna Menon)

सरकारने रस दाखवला नाही

या दत्तक विधानाला विजयमाला यांनीदेखील विरोध दर्शवला होता. त्यांनी त्यासाठी तत्कालीन भारत सरकारकडे पाठपुरावा करत पद्माराजे यांच्या मुलाला दत्तक घेण्याची जोरदार मागणी केली होती मात्र त्यावेळच्या राज्यातील बड्या नेत्यांनी आणि सरकारने या कौटुंबिक विषयात फार रस दाखवला नाही. (Kolhapur Shahu Chhatrapati adoption)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.