पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आपल्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मी मदतीला पहिले धावून जाईन. असं पंतप्रधान म्हणाले आहेत. (PM Narendra Modi)
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “दोन गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल.” (PM Narendra Modi)
…ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे
“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन.” असं नरेंद्र मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community