Ram Satpute: भाजपा उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी करणं काँग्रेस कार्यकर्त्याला भोवलं!

264
Ram Satpute: भाजपा उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी करणं काँग्रेस कार्यकर्त्याला भोवलं!
Ram Satpute: भाजपा उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी करणं काँग्रेस कार्यकर्त्याला भोवलं!

भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर (Raj Salgar) यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Ram Satpute)

(हेही वाचा –भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं Eknath Khadse प्रचाराला मैदानात!)

राम सातपुते (Ram Satpute) आणि भाजपा विरोधात मिम्स वायरल करण्यात आला होता. त्यामुळे जनमाणसांत प्रतिमा मलीन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 500 आणि 501 नुसार या बदनामी प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ram Satpute)

(हेही वाचा –Narayan Rane: शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्षे जगले नसते, नारायण राणेंची जहरी टीका)

हे मिम्स व्हायरल झाल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. मे महिन्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांची काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यात लढत होणार आहे. ७ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सोलापूरमध्ये रणधुमाळी पाहायला मिळत आहे. (Ram Satpute)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.