IPL 2024, Rohit on Captaincy : ‘सगळंच काही तुम्हाला मिळत नाही,’ असं रोहित शर्मा का म्हणतो?

IPL 2024, Rohit on Captaincy : मुंबई इंडियन्सची कप्तानी गेल्यावर काय वाटलं, या प्रश्नावर रोहितने मोकळेपणाने उत्तर दिलं आहे 

171
T20 World Cup Ind vs Pak : रोहितला सरावादरम्यान पुन्हा दुखापत
  • ऋजुता लुकतुके

‘सगळंच काही तुमच्या मनासारखं होत नसतं,’ या शब्दांत रोहित शर्माने (IPL 2024, Rohit on Captaincy) मुंबई इंडियन्स संघाबरोबरचा आपला काही महिन्यांचा अनुभव सांगताना म्हटलंय. या हंगामाच्या सुरुवातीला अचानक त्याच्याकडून फ्रँचाईजी मालकांनी कप्तानी काढून घेऊन ती बाहेरून आलेल्या हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवली. आणि त्यानंतर मुंबई संघाचा आणि खुद्द रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्मही डळमळीत आहे. या सगळ्याचं वर्णन रोहितने या एका वाक्यात केलं. (IPL 2024, Rohit on Captaincy)

(हेही वाचा- Ram Satpute: भाजपा उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी करणं काँग्रेस कार्यकर्त्याला भोवलं!)

कप्तानीबद्दल बोलताना रोहित म्हणतो, ‘हा खेळाचा भाग आहे. यापूर्वीही मी कर्णधार नसताना अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे. धोणी, सेहवाग आणि विराट कोहली यांच्याबरोबरच ॲडम गिलख्रिस्ट, हरभजन यांच्या हाताखालीही खेळलो आहे. आताही मी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळतोय. इतकंच या गोष्टीचं महत्त्व माझ्या लेखी आहे.’ (IPL 2024, Rohit on Captaincy)

रोहितवर (Rohit Sharma) आयपीएलच्या मागच्या दोन हंगामात बॅटने चांगली कामगिरी न केल्याचा आरोपही होत होता. पण, आता सतराव्या हंगामात रोहितने ती मरगळ धुवून काढली आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत ३१४ धावा केल्या आहेत. ‘खेळाडू म्हणून तुम्हाला जे करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो,’ असं यावर रोहितचं म्हणणं आहे. (IPL 2024, Rohit on Captaincy)

(हेही वाचा- T20 World Cup 2024 : ‘रिंकू सिंगला वगळण्याचा निर्णय सगळ्यात कठीण होता,’ – अजित आगरकर)

हंगाम सुरू होण्यापूर्वी रोहीतच्या ऐवजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ प्रशासनाने नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली. हा निर्णय इतका अचानक जाहीर झाला की, मुंबई फ्रँचाईजीच्या चाहत्यांनाही तो रुचला नाही. आणि सुरुवातीला जवळ जवळ प्रत्येक सामन्यात चाहत्यांकडून हार्दिकची हुर्यो उडवली जात होती. शिवाय मैदानावर मुंबईची कामगिरी चांगली होत नसल्याचा फटकाही संघाला बसला. आतापर्यंत मुंबई इंडियन्सनी १० पैकी ३ सामनेच जिंकले आहेत. आणि ते गुण तालिकेत नवव्या स्थानावर आहेत. (IPL 2024, Rohit on Captaincy)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.