Bhalji Pendharkar : मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेणारे भालजी पेंढारकर

भालजी पेंढारकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुकपटांच्या काळापासूनच केली.

199
Bhalji Pendharkar : मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेणारे भालजी पेंढारकर

भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपट सृष्टीतील गाजलेले व्यक्तिमत्त्व होते. चित्रपट सृष्टीतला सर्वांत प्रतिष्ठित मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे. विशेष म्हणजे त्यांचा क्रांतिकारकांसी आणि सावरकर कुटुंबाशी जवळचा संबंध होता. (Bhalji Pendharkar)

भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांचा जन्म ३ मे १८९७ साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर गोपाळ पेंढारकर आणि आईचं नाव राधाबाई असं होतं. भालजी पेंढारकर यांचे अनेक मित्रमंडळी आणि जवळचे नातेवाईक चित्रपट सृष्टीमध्ये नावाजलेल्या लोकांपैकी होते. त्यांचे मोठे भाऊ बाबुराव पेंढारकर, सावत्र भाऊ अभिनेते आणि दिग्दर्शक मास्टर विनायक कर्नाटकी आणि त्यांचे चुलत भाऊ व्ही. शांताराम हे महान कलाकार होते. (Bhalji Pendharkar)

(हेही वाचा – Uma Bharti : राम मंदिर आंदोलनात सक्रिय असणार्‍या उमा भारती)

भालजी पेंढारकर यांचे ‘हे’ विशेष गाजलेले चित्रपट

भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुकपटांच्या काळापासूनच केली. सुरुवातीला ते कोल्हापुरातच स्टुडिओमध्ये काम करायचे. त्यानंतर ते प्रभात फिल्म कंपनीसोबत काम करू लागले. मग त्यांनी स्वतःचा स्टुडिओ विकत घेतला. भालजी पेंढारकर यांनी आपली मुलं प्रभाकर आणि जयसिंग यांची नावं एकत्रित करून आपल्या स्टुडिओचं नाव ‘जयप्रभा’ असं ठेवलं होतं. (Bhalji Pendharkar)

त्यावेळी ते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून काम करायचे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणीही लिहिली आहेत. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांपैकी नेताजी पालकर, थोरतांची कमला, छत्रपती शिवाजी, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं आणि तांबडी माती हे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. (Bhalji Pendharkar)

(हेही वाचा – IPL 2024 SRH vs RR : हैद्राबादचा एका धावेनं विजय आणि आयपीएलमधील आणखी काही विक्रम)

भालजींनी मराठी चित्रपटसृष्टीला नेले वेगळ्या उंचीवर

भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांना दोन पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा प्रभाकर यांनी १९५० च्या दशकात बनवण्यात आलेल्या ‘दो आँखे, बारा हाथ’ नावाच्या चित्रपटात आपले योगदान दिले होते. प्रभाकर पेंढारकर यांनी ‘रारंगढांग’ नावाचे पुस्तक लिहिले होते. तसेच ते उल्लेखनीय डॉक्युमेंटरी फिल्म्सचे लेखक आणि दिग्दर्शकही होते. (Bhalji Pendharkar)

भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांच्या दुसऱ्या पत्नी लीला चांद्रगिरी या १९३० च्या दशकातल्या हिंदी तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री आणि गायिका होत्या. भालजी पेंढारकर यांच्याशी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना आधीपासूनच दोन मुले होती. एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोन्ही मुलांना भालजी पेंढारकर यांनी दत्तक घेतलं. त्यांपैकी मुलाचं नाव जयसिंग असं होतं. त्यांच्या मुलीने नंतर कादंबरीकार रणजित देसाई यांच्याशी लग्न केलं. त्यांना सर्वजण माधवी देसाई या नावाने ओळखतात. माधवी देसाई यांनी ‘नाच ग घुमा’ नावाचं पुस्तकही लिहिलं होतं. भालजी पेंढारकरांना आणखी एक मुलगी होती. त्यांचं नाव सरोज चिंदरकर असं होतं. भालजींनी मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी निर्माण केलेले शिवकाळातील चित्रपट आजही लोक भक्तिभावाने पाहतात. (Bhalji Pendharkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.