बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)
दरम्यान या नोटिशीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांकडून आलेला खुलासा अयोग्य असल्यास प्रशासनालादेखील समितीकडे जाण्याचा अधिकार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी, (दि. १) झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. (Lok Sabha Election 2024)
त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा व योग्य वाटत नसल्याचे सांगत पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे, मात्र ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – ‘मी काय बघते, यापेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, Chitra Wagh यांचा अंधारेंना सवाल)
Join Our WhatsApp Community