IPL 2024 SRH vs RR : ट्रेव्हिस हेड खरंच नाबाद होता?

IPL 2024 SRH vs RR : ट्रेव्हिस हेड धावबाद नसल्याचा तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्वाळा वादात सापडलाय. 

183
IPL 2024 SRH vs RR : ट्रेव्हिस हेड खरंच नाबाद होता?
  • ऋजुता लुकतुके

मैदानावरील पंचांचे निर्णय चुकू शकतात म्हणून क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांची नेमणूक करण्याचा निर्णय झाला. त्यांना आधुनिक कॅमेराचे वेगवेगळे अँगल आणि फलंदाजांच्या बॅटची कड चेंडूला लागली आहे की नाही, हे ओळखण्यासाठी स्नीकोमीटरची सोयही त्यांच्यासाठी करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या मदतीने मैदानातील पंचांना निर्णय घेणं सोपं जावं, यासाठी हा खटाटोप करण्यात आला. पण, अनेकदा तिसऱ्या पंचांचे निर्णयही वादग्रस्त ठरू शकतात. (IPL 2024 SRH vs RR)

असंच एक उदाहरण सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात समोर आलं. हैद्राबादचा डाव सुरू असताना पंधराव्या षटकात ट्रेव्हिस हेड विरोधात एक धावचीतचं अपील झालं. तिसऱ्या पंचांनी टीव्ही रिप्ले पाहून हेड क्रीझच्या आत असल्याचा निर्वाळा दिला. पण, अजूनही काही जणांचं मत आहे की, हेडची बॅट खेळपट्टीला टेकलेली नव्हती. एकदा रिप्ले पाहूया, (IPL 2024 SRH vs RR)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नऊ खासदारांची तिकीटे कापली! पण का? काय होती त्या मागची कारणे? वाचा)

आवेश खानचा हा चेंडू वाईड होता. हेडने तो खेळण्याचा प्रयत्न केला. पण, ते करताना त्याचा तोल गेला. संजू सॅमसन यष्टीरक्षण करत असताना हेडचा झालेला गोंधळ त्याच्या लक्षात आला आणि त्याने हलकेच यष्ट्या उडवल्या. त्यावेळी हेडची बॅट काहीशी हवेत होती, असं प्रथमदर्शनी टीव्ही रिप्लेमध्ये दिसतं. बॅट क्रीझच्या आत पण, हवेत होती. (IPL 2024 SRH vs RR)

ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू आणि समालोचक सायमन कॅटिच यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ‘बॅट हवेत दिसत आहे. तरीही तिसऱ्या पंचांनी नाबाद दिलंय,’ असं कॅटिच म्हणाले. तर राजस्थान संघाचे प्रशिक्षक कुमार संगकारा आणि खेळाडूही या निर्णयामुळे भलते संतापलेले दिसले. हेडला इथं फायदा झाला असला तरी या संधीचं तो सोनं करू शकला नाही आणि आवेश खानच्या पुढच्याच चेंडूवर तो ५८ धावा करून बाद झाला. (IPL 2024 SRH vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.