Mumbai Metro: लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मुंबई मेट्रो 10% सूट देणार, कोणत्या मार्गांवर? वाचा सविस्तर

150
Mumbai Metro: पावसामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, कसे असेल वेळापत्रक ? वाचा सविस्तर

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मुंबईत २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या सोयीसाठी सरकारकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. मुंबई मेट्रोनेही मतदारांसाठी विशेष सूट द्यायचे ठरवले आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सूट देण्यात येणार आहे. (Mumbai Metro)

मुंबईत मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवार, (२० मे)  मुंबई मेट्रोकडून मतदारांना १० टक्के सूट देण्यात येणार आहे. मतदान करून परतणाऱ्या मतदारांना मुंबई वन कार्ड, कागदी क्यू. आर. आणि कागदी तिकिटांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सवलत मुंबई मेट्रोकडून देण्यात आली आहे. मेट्रो मार्ग 2ए अंधेरी पश्चिम-दहिसर पूर्व आणि ७ दहिसर पूर्व-अंधेरी पश्चिमवर ही सवलत देण्यात आली आहे. (Mumbai Metro)

(हेही वाचा – Hemant Soren: हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.