- सुजित महामुलकर
अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी आर-पारची लढाई असल्याने पवार यांनी आपले शेवटचे अस्त्र बाहेर काढले आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना कन्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरवले आहे. (Sharad Pawar)
अजितदादांचे बारामतीवर लक्ष केंद्रित
बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार यांची कन्या सुप्रिया विरुद्ध अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा अशी थेट लढत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामतीत आपले सगळे लक्ष केंद्रित केले असल्याने शरद पवार गटात चलबिचल सुरू झाली आहे. अजितदादांनी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केल्याने शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा यांना प्रथमच राजकीय मैदानात उतरवले आहे. प्रतिभा पवार यांनी अनेकदा शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली आहे मात्र राजकीय नव्हे. (Sharad Pawar)
महिला मेळावा
आज शुक्रवारी ३ मे ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यात प्रतिभा पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली आणि सुप्रिया यांना मतदान करण्याचे आवाहन केले. (Sharad Pawar)
(हेही वाचा – Mumbai Metro: लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मुंबई मेट्रो 10% सूट देणार, कोणत्या मार्गांवर? वाचा सविस्तर)
कुटुंबात प्रतिभाताईंचा शब्द अंतिम
पवार कुटुंबात प्रतिभा यांना प्रचंड आदर असून त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. अजित पवार हेदेखील त्यांच्या शब्दाबाहेर कधी गेले नाहीत. २०१९ ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘तथाकथित पहाटे’चा (सकाळी ८ वाजता) शपथविधी केला. त्या बंडातील हवा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी याच प्रतिभा ‘अस्त्रा’चा वापर केला होता. अनेक प्रयत्न करूनही अजित पवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तेव्हा त्यांच्या प्रतिभाकाकी यांनी अजित पवार यांना पक्षात परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. (Sharad Pawar)
अजितदादांची अडचण
गेली कित्तेक वर्षे हा प्रघात सुरू होता. आता हे अस्त्र अजित पवार यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी वापरण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे. प्रतिभाकाकी प्रचारात उतरल्याने अजित पवार यांची अडचण झाली असून अजित पवार यांना बारामतीच्या गडाला खिंडार पाडणे जड जाऊ शकते. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community