सिग्मंड एस्को जॅक्सन जो जॅकी जॅक्सन म्हणून प्रसिद्ध आहे, हा एक अमेरिकन गायक आणि गीतकार आहे जो जॅक्सन ५ चा संस्थापक सदस्य देखील आहे. त्याला १९९७ मध्ये रॉक अँड रोल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले होते. सिग्मंड एस्को जॅक्सनचा जन्म ४ मे १९५१ मध्ये पूर्व शिकागो, इंडियाना येथील सेंट कॅथरीन हॉस्पिटलमध्ये झाला. त्याला त्याचे आजोबा सॅम्युअल जॅक्सन यांनी जॅकी हे टोपणनाव दिले होते. पुढे त्याच नावाने तो प्रसिद्ध झाला. (Jackie Jackson)
जॅकीची भावंडे गायक आहेत. मात्र त्यांच्या नैसर्गिक गाण्याच्या शैलीमुळे तो जास्त प्रसिद्ध झाला. त्याने “आय वॉन्ट यू बॅक” आणि “एबीसी” असे अनेक चांगले अल्बम काढले आहेत. १९८१ मध्ये “कॅन यू फील इट” हे गाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट ठरले. १९८४ च्या व्हिक्टरी अल्बममध्ये, जॅकीने “वेट” या गाण्यावर काम केले होते, त्याचबरोबर “टोर्चर” हे गाणे त्याने स्वतः लिहिले. (Jackie Jackson)
(हेही वाचा – Mumbai Metro: लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मुंबई मेट्रो 10% सूट देणार, कोणत्या मार्गांवर? वाचा सविस्तर)
जॅकीने त्याचा पहिला ‘हा’ अल्बम केला रिलीज
१९८४ मध्ये व्हिक्टरी अल्बमच्या टूरवर जाण्यापूर्वी, रिहर्सल दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र तो लवकरच बरा झाला आण इ पुढच्या प्रवासाला निघाला. डिसेंबर १९८४ त्याने जाहीर केले की तो ग्रूप सोडतोय. (Jackie Jackson)
१९७३ मध्ये, जॅकीने त्याचा पहिला एकल अल्बम ’जॅकी जॅक्सन’ रिलीज केला. हा अल्बम ठीकठाक चालला. पुढे २००२ मध्ये, लास वेगासमध्ये जॅकीने जेस्को रेकॉर्ड्स आणि फ्यूचरिस्ट एंटरटेनमेंट या दोन रेकॉर्ड कंपन्या स्थापन केल्या. जॅकी हा एक यशस्वी गायक आहे आणि त्याच्या भावंडांमध्ये तो उजवा आहे. (Jackie Jackson)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community